आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर आज म्हणजेच 2 डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. मेंदी आणि हळदी समारंभानंतर गुरुवारी रात्री अक्षया-हार्दिकचा संगीत सोहळाही मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. या सोहळ्यातील व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अक्षया आणि हार्दिकच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या सोहळ्याचे खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील कलाकारांनी या संगीत सेरेमनीत परफॉर्म केले. ‘मॅचिंग नवरा’ पाहिजे या गाण्यावर मालिकेतील कलाकार थिरकले. अभिनेत्री वीणा जगतापनेही या संगीत सोहळ्यात ठुमके लावले. या डान्सचा व्हिडिओ मालिकेत बरकतची भूमिका वठवणारा अभिनेता अमोल नाईकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत.
संगीत सेरेमनीत अक्षयाने डिझायनर गाऊन परिधान केला होता. तर हार्दिकने मॅचिंग कोट परिधान केला होता. नातेवाईक, मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत अक्षया-हार्दिकच्या संगीत सोहळ्याचे जंगी सेलिब्रेशन करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.