आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठकबाईंनी अहोंसाठी घेतला खास उखाणा:म्हणाली -  राणाजी राणाजी करत दिवस गेले सरून...; तुम्हीही ऐका कान देऊन

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी नुकतेच लग्नाच्या बेडीत अडकले. पुण्यात दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नविधी पार पडल्यानंतर अक्षयाने हार्दिकसाठी खास उखाणा घेतला.

अक्षयाने घेतलेल्या उखाण्याचा व्हिडिओ चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल होतोय. अक्षया आणि तिची मैत्रीण ऋचा आपटे यांनी मिळून हा उखाणा तयार केला होता.

उखाणा घेत अक्षया म्हणते, 'खरं तर उखाणा असतो दोन ओळींचा फक्त, पण संधी चालून आलीये तर होईन म्हणते व्यक्त,
कामासाठी घर सोडून धरली वेगळी वाट, प्रेमात पडले कोल्हापूरच्या पाहून शाही थाट
मग राणाजी राणाजी करत दिवस गेले सरून, राणाच्या आतल्या खऱ्या माणसाचा ठेवला हात धरून...
तुझ्यात जीव रंगता रंगता वेळ आली निघायची, कुठेतरी एक खात्री होती पुन्हा एकत्र येण्याची
दोघांनी मिळून निर्णय घेतला आयुष्यभराच्या साथीचा, अक्षय तृतीया मुहूर्त ठरला आमच्या साखरपुड्याचा...
उखाणा घेते म्हणत म्हणत कहाणी झाली सांगून, हो हो आता घेते नाव ऐका कान देऊन
उखाण्यासाठी विचार करून शक्कल लढवलीये अशी, माझंही नाव घेते तेवढ्यात अक्षया हार्दिक जोशी...'

अक्षयाच्या या उखाण्यावर मंडपातील सगळेच आनंदाच्या भरात ओरडू लागले व तिचे कौतुक करू लागले. तिचा उखाणा ऐकून हार्दिकही तिच्याकडे पाहतच राहिला. अक्षयाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. चाहते तिच्या या उखाण्याचं प्रचंड कौतुक करत आहेत.

सोबतच बघा अक्षया-हार्दिकच्या लग्नाचे काही नवीन फोटोज...

बातम्या आणखी आहेत...