आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Akshay's 127 Crore Deal: Akshay Is Doing 3 Films With Aanand L.Rai, One Film Was Shot In That Viran Haveli, Where No Film Was Shot For 60 Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खिलाडी कुमारची 127 कोटींची डील:आनंद एल. रायसोबत 3 चित्रपट करतोय अक्षय कुमार, एका चित्रपटाचे अशा हवेलीत चित्रीकरण केले जिथे 60 वर्षांपासून चित्रीकरणच झाले नव्हते

अमित कर्ण12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चकिया (चंदौली) येथे झाले 'अतरंगी रे'चे शूटिंग

अभिनेता अक्षय कुमार आणि दिग्दर्शक-निर्माता आनंद एल. राय यांनी तीन चित्रपटांचा करार केला आहे. हे 3 चित्रपट म्हणजे 'अतरंगी रे', 'रक्षाबंधन' असून आणखी एका चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. याची पुष्टी करताना अक्षय कुमारचे निकटवर्तीय म्हणाले की, हा करार 127 कोटींचा आहे. गेल्या वर्षभरापासून 'अतरंगी रे'साठी अक्षयला 120 कोटी रुपये मिळाल्याची चर्चा सुरु होती. यातच आता वृत्त आहे की, अक्षयने आनंद एल. रायसोबत तीन सिनेमे साइन केले आहेत. या दोन चित्रपटांचे दिग्दर्शन आनंद स्वत: करत आहेत तर तिस-या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दुस-या दिग्दर्शकाकडे सोपवण्यात येणार आहे. अक्षयच्या तिसर्‍या चित्रपटाचा तपशील येत्या काही महिन्यांत समोर येईल.

'अतरंगी रे' चित्रपटातील गाण्यासाठी तयार केला जातोय 8 कोटींचा सेट
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय दीड महिन्यानंतर 'रक्षाबंधन' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल आणि 15 मार्चपासून तो 'अतरंगी रे' च्या पुढील शेड्यूलमध्ये सामील होईल. अतरंगी रे या चित्रपटातील साँग सिक्वेन्स 15 मार्चपासून सुरू होईल आणि यासाठी 8 कोटींचा सेट फिल्म सिटीमध्ये बनवला जात आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य हे आहेत. या गाण्यात सारा अली खान आणि अक्षय कुमार यांच्यासह 100 ज्युिनअर डान्सर्स दिसणार आहेत. अक्षय 2 मार्चपर्यंत 'बच्चन पांडे'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

चकिया (चंदौली) येथे झाले 'अतरंगी रे'चे शूटिंग

सूत्रांनी सांगितल्यानुसार, 'अतरंगी रे' या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे चित्रीकरण बनारसपासून 45 कि.मी. अंतरावर असलेल्या चकिया (चंदौली) येथे झाले. एक निर्जन वाड्याची दुरुस्ती करून शूटिंग पूर्ण करण्यात आले आहे. सेटवरच्या लोकांनी सांगितले की, 'अतरंगी रे' या चित्रपटाच्या आधी 60 वर्षांपूर्वी येथे चित्रपटाचे शूटिंग झाले होते. या चित्रपटाची कहाणी बिहारच्या पार्श्वभूमीवर आहे. हा चित्रपट दक्षिण भारतातून बिहारमध्ये प्रवास करतो. चित्रपटाचे जास्तीत जास्त चित्रीकरण हे बनारस येथे झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...