आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वॉरियर्सला सलाम:अक्षय, माधुरी, करण आणि कार्तिक यांनी बदलला डीपी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लावला महाराष्ट्र पोलिसांचा लोगो   

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या यादीमध्ये कार्तिक आर्यनच्याही नावाचा समावेश आहे, त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आवाहनावरून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील डीपीचा डिस्प्ले फोटो बदलला आहे. या सर्वांनी इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवला आहे. तसेच कोरोनासाठी रात्रंदिवस लढणार्‍या या योद्धांना त्यांच्या वतीने अभिवादन केले आहे.

करण जोहरने लिहिले - या कठीण काळातही न थकता आपल्या सुरक्षेसाठी लढा देणा-या मुंबई पोलिसांचे आम्ही आभारी आहोत. आम्ही त्याचे आभारी आहोत, म्हणून त्यांचा आदर करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.

अक्षय, माधुरी, कार्तिक यांनीही फोटो बदलला

अनिल देशमुख यांच्या या आवाहनानंतर अक्षय कुमार आणि माधुरी दीक्षित यांनी त्यांचे प्रोफाइल फोटो बदलले आहेत. अक्षयने त्याबद्दल काहीही लिहिले नाही. पण माधुरीने ट्विटमध्ये लिहिले आहे - मुंबई पोलिसांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. त्यांचे निस्वार्थ काम जे ते आपल्यासाठी करत आहेत. आम्ही  आपला डिस्प्ले बदलत आहोत, त्यांचे आम्ही आभारी आहोत, हे सांगण्यासाठी.

या यादीमध्ये कार्तिक आर्यनच्याही नावाचा समावेश आहे, त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

बातम्या आणखी आहेत...