आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:मल्याळम दिग्दर्शक श्रीकुमार मेननला अटक, एक कोटी रुपये घेऊनही चित्रपट बनवलाच नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिग्दर्शक श्रीकुमार मेननला पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतले आहे.

मल्याळम चित्रपट दिग्दर्शक श्रीकुमार मेननला फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अलप्पुझा पोलिसांनी गुरुवारी रात्री पलक्कड येथील राहत्या घरातून मेननला अटक केली. श्रीकुमारवर आरोप आहे की, चित्रपट करण्यासाठी त्याने अलप्पुझा येथील एका व्यावसायिकाकडून 1 कोटी रुपये घेतले होते, परंतु पैसे घेतल्यानंतर त्याने चित्रपट बनवला नाही. श्रीकुमारला मोहनलाल स्टारर 'ओडियन' या गाजलेल्या चित्रपटासाठी ओळखले जाते.

अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत होता श्रीकुमार मेनन
श्रीकुमार मेननने अटकेपासून स्वत: चा बचाव करण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिकादेखील दाखल केली होती, परंतु कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावली. शुक्रवारी पोलिसांनी मेननला न्यायालयात हजर केले होते.

अनेकदा वादाच्या भोव-यात अडकला आहे श्रीकुमार
श्रीकुमार पहिल्यांदाच वादात सापडला असे नाही. यापूर्वी 2019 मध्ये अभिनेत्री मंजू वॉरियरने श्रीकुमारवर बदनामी केल्याचा आरोप केला होता. यानंतर पोलिसांनी चौकशीनंतर मेननला जामिनावर सोडले होते. 2018 मध्ये, प्रख्यात लेखक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते एम.टी. वासुदेव नायर यांच्याशीही एका स्क्रिप्टवरून त्याचा वाद झाला होता.

बातम्या आणखी आहेत...