आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोशल मीडियावर ट्रोलिंग, अनेक पक्ष आणि संघटनांकडून विरोध, पोलिसात दाखल केलेल्या तक्रारी आणि अनेक धमक्या मिळाल्यानंतर अखेर 'तांडव'च्या मेकर्सनी माफी मागितली आहे. 15 जानेवारीला अॅमेझॉन प्राइमवर स्ट्रीम झालेल्या वेबसीरीजला फक्त 4 दिवसात प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. अखेर सोमवारी दिग्दर्शक अली अब्बास जफरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन याबद्दल माफी मागितली.
Our sincere apologies . pic.twitter.com/Efr9s0kYnl
— ali abbas zafar (@aliabbaszafar) January 18, 2021
अलीने पोस्टमध्ये लिहीले- आम्ही तांडवच्या दर्शकांचे प्रतिक्रिया बारकाईने पाहत आहोत आणि आज आम्हाला सूचना आणि प्रसारण मंत्रालयने सांगितले की, एक याचिका दाखल झाली आहे. आम्हाला समजले की, वेबसीरीजच्या काही कटेंटमुळे काही जणांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ही गोष्ट संपूर्णपणे काल्पनिक आहे आणि कोणत्याही घटनेची याची तुलना फक्त एक योगायोग आहे.'
'आमचा कोणतीही व्यक्ती, जाती, समाज, धर्म किंवा धार्मिक विश्वासांना ठेस पोहचवणे किंवा संस्था, राजकीय पक्ष आणि जिवंत-मृत व्यक्तीचा अपमान करण्याचा उद्देश नाही. तांडवचे कलाकार आणि क्रु लोकांच्या भावनांचा आदर करत, माफी मागतो.
वेबसीरिजमध्ये अनेक कलाकार
तांडव 15 जानेवारीला रिलीज झालेली डायरेक्टर अली अब्बास जफरची डिजीटल डेब्यू वेबसीरीज आहे. यात सैफ अली खान, डिंपल कपाड़िया, मोहम्मद जीशान अयूब, सुनील ग्रोवर, तिग्मांशु धूलिया, गौहर खान आणि कुमुद मिश्रासारखे कलाकार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.