आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर इंटरव्ह्यू:सलमानकडून जे शिकलो त्याचा उपयोग सैफसोबत काम करताना झाला, 7 वर्षांपूर्वी आला होता ‘तांडव’चा विचार - अली अब्बास जफर

अमित कर्ण3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘तांडव’ सीरिज शेक्सपीअरच्या कथांसारखी

या शुक्रवारी सैफ अली खानची राजकारणावर आधारित मालिका ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून दिग्दर्शक अली अब्बास जफर डिजिटल माध्यामात पदार्पण करणार आहेत. आम्ही या कल्पनेबद्दल सात वर्षांपूर्वीच विचार केला होता. खरंतर, राजकारण हा एक मजेदार विषय आहे. टीव्हीवर अधिक लोक हाच विषय पाहणे पसंत करतात. म्हणून, तांडव सारखं राजकीय नाट्य लोकांना नक्कीच आवडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘तांडव’ सीरिज शेक्सपीअरच्या कथांसारखी
अली अब्बास म्हणाले, तांडव सीरिज शेक्सपिअरच्या नाटकांसारखी आहे. तांडव ही ऑथेल्लो आणि मेकबेथ यासारखीच आहे. शेक्सपीअरच्या कथांमधले पात्र ज्याप्रमाणे सत्तेसाठी डावपेच आखतात, तसेच काहीसे यातही पहायला मिळेल. त्यामुळे, यातील मुख्य पात्र असणाऱ्या समर प्रताप सिंह आणि अनुराधा इतकीच प्रत्येक भूमिका महत्वाची आहे.

सैफ आणि डिंपल यांना राजी करणे सोपे होते
सैफ अली खान यांना घेण्याविषयी अब्बास अली म्हणाले, सैफ यांना समर प्रताप सिंहांची भूमिका करण्यासाठी तयार करणे जास्त अवघड नव्हते. कारण, यातील प्रत्येक पात्र चांगल्या पद्धतीने लिहिलेले आहे. अनुराधाच्या भूमिकेसाठी डिंपल कपाडिया यांना राजी करण्यातही काही वेळ लागला नाही. त्यावेळी त्या टेनेटचे चित्रिकरण करत होत्या. दोघेही पहिल्यांदा विचारल्यावर लगेच तयार झाले.

पटौदी पॅलेसमध्ये झाले चित्रीकरण
तांडवचे चित्रीकरण दिल्लीसोबतच पटौदी पॅलेसमधेही झाले आहे. बरीच शूटिंग तेथील विद्यापीठामध्येही करण्यात आली आहे. हे चित्रीकरण अगदी सहज पार पडले. या मालिकेच्या नऊ भागांच्या चित्रीकरणासाठी फक्त 60 दिवस लागले. माझ्या मते, वेबवरील कार्यक्रमाचा स्तर आता उंचावला आहे. सैफनंतर अक्षय कुमारसुद्धा डिजिटल माध्यमात उतरण्यासाठी तयार असणारे प्रसिद्ध नाव आहे. सलमान खानसोबत मात्र अशी प्रत्यक्ष चर्चा कधी झाली नाही.

सलमान आणि सैफ सारखेच आहेत
सैफ व सलमान खान दोघेही सारखेच अभिनते आहेत. दोघेही आपल्या दिग्दर्शकाचे म्हणणे ऐकतात. म्हणून, सलमान सोबत काम करताना मी जे काही शिकलो, त्याचा उपयोग सैफसोबत काम करतानाही झाला. सैफ फक्त सिनेमावरच बोलत नाही तर तो फिजिक्स, केमिस्ट्री, हिस्ट्री सर्व विषयावर बोलत असतो.

बातम्या आणखी आहेत...