आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जस्ट मॅरीड:अली अब्बास जफरने दाखवली पत्नीची पहिली झलक, रोमँटिक अंदाजात म्हणाला - 'तू आयुष्यभरासाठी आता माझी आहेस'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 जानेवारी रोजी अली आणि अलिशिया यांचा निकाह झाला.

अभिनेता सलमान खान स्टारर 'भारत' आणि 'एक था टायगर' या चित्रपटांचा दिग्दर्शक अली अब्बास जफर 3 जानेवारी रोजी देहरादून येथे लग्नाच्या बेडीत अडकला. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अलीने लग्नाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. मात्र फोटो शेअर करताना अलीने पत्नीचा चेहरा आणि तिची ओळख लपवून ठेवली होती. पण आज अलीने एक फोटो शेअर करुन पत्नीची झलक दाखवली आहे. अलिशिया जफर हे अलीच्या पत्नीचे नाव आहे.

फोटोसह अलीने एक पोस्ट शेअर करत लिहिले, '1400 वर्षापूर्वी, इमाम अली फातिमा अल जाराला म्हणाले - मी जेव्हा तुझा चेहरा पाहतो तेव्हा माझ्या सर्व चिंता आणि वेदना मिटतात. मलाही असेच वाटत आहे अलिशिया जफर... तू आयुष्यभरासाठी आता माझी आहेस,' अशा रोमँटिक शब्दात अलीने पत्नीसाठीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यापूर्वी अलीने जी पोस्ट शेअर केली होती, त्यात तो पत्नीचा हात पकडून दिसतोय. पण त्याच्या पत्नीचा चेहरा दिसत नाहीये. कॅप्शनमध्ये अलीने रेड हार्टसह लिहिले होते, 'बिस्मिल्लाह'

अली बॉलिवूडचा नावाजलेला दिग्दर्शक असून त्याने सलमान खान स्टारर सुल्तान, टायगर जिंदा है आणि भारत या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

गेल्या वर्षी त्याने ईशान खट्टर आणि अनन्या पांडे स्टारर ‘खाली-पिली’ या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवले होते

अली लवकरच डिजिटल पदार्पण करणार आहे. त्याची वेब सीरिज 'तांडव' अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहेत. सैफ अली खान, डिंपल कपाडिया आणि सुनील ग्रोव्हर यात दिसणार आहेत. ही वेब सीरिज येत्या 15 जानेवारीला रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...