आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रीयूनाइट:'मिर्जापुर 2'ची तयारी अंतिम टप्प्यावर, फायनल डबिंगसाठी टीमसोबत स्टूडिओत पोहचला अभिनेता अली फजल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड इंडस्ट्री शूटिंग आणि पोस्‍ट प्रोडक्‍शनचे काम रुळावर आणण्याचे काम करत आहे. अभिनेता अली फजल आणि' मिर्जापुर-2'ची टीम काही दिवसांपासून आपल्या घरातूनच सीरीजच्या डबिंगचे काम करत होती. पण, आता गुरुवारपासून सर्वांनी रेकॉर्डिंग स्‍टूडिओत येणे सुरू केले आहे. अली फजल, श्वेता त्रिपाठी आणि सीजनच्या प्रमुख सदस्यांसोबतच, प्रोडक्शन टीमचे लोकही यात सामील आहेत.

याबाबत अली म्हणाला की, “आम्ही लॉकडाउनपूर्वीच काही एपिसोड डब केले होते. परत काम सुरू झाल्यामुळे चांगलं वाटतं आहे. आम्ही शो ची शूटिंक खूप आधीच पूर्ण केली होती, त्यामुळे परत ट्रॅकवर येण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागला. सर्व अभिनेते डबिंगसाठी आपापल्या वेळेनुसार यायचे, पण आता सर्वजण एकाचवेळी आले. डबिंट स्टुडिओमध्ये स्वच्छतेवर खास लक्ष ठेवले जाते. एकावेळी एकाच कलाकाराल डबिंड रुममध्ये सोडले जाते."

चाहते नेहमी प्रश्न विचारायचे

अली पुढे म्हणाला की, “आम्हाला नेहमी कमी लेखण्यात आले, पण चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिले. महामारीमुळे शो रिलीज करण्यात खूप उशीर झाला आहे. या लॉकडाउनमध्ये चाहत्यांनी अनेकवेळ शोच्या रिलीजबद्दल विचारणा केली.”