आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Ali Fazal Interview | Ali Fazal Bollywood | Marathi News | Ali Feels Lucky To Have The Opportunity To Work With Veteran Actors Like Kenneth Branagh: Ali

अली फजलची मुलाखत:केनेथ ब्रानाघसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत कामाची संधी मिळाल्याने स्वत:ला भाग्यवान समजतो : अली

अमित कर्ण। मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हॉलीवूडमध्ये संधी आणि ‘डेथ ऑन द नाइल’ चित्रपटावर अली फजलने संवाद साधला

बॉलीवूड ते हॉलीवूडचा प्रवास करणाऱ्यांपैकी अली फजलदेखील एक आहे. तो हॉलीवूड चित्रपटात झळकणार आहे. सध्या त्याचा ‘डेथ ऑन द नाइल’ चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. अली यात एका संशयित मर्डर अँड्रयू काचाड्युरियनच्या भूमिकेत दिसणार आहे. या मुलाखतीत त्याने या चित्रपटाविषयी आणि आपल्या करिअरविषयी संवाद साधला...

अँड्रयूच्या भूमिकेसाठी कसा प्रतिसाद मिळतोय ?

मला स्वत:ची स्तुती करणं जमत नाही, मात्र जगभरातून मला प्रेम मिळत आहे. हा माझा सर्वात मोठा हॉलीवूड चित्रपट आहे. आम्हाला प्रत्येक देशात स्क्रीन मिळाली. कारण अगाथा ख्रिस्तीच्या कथांचे चाहते जगभरात आहेत. शिवाय ही मोठी फ्रँचायझी ठरली. ‘फास्ट अँड फ्युरियस ७’ मध्ये तर मी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती मात्र यात माझा महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे मी यात मोठा भागधारक असल्याचे वाटत आहे.

अगाथा ख्रिस्तीच्या कादंबऱ्या महाकाव्य आहेत. त्यांच्याशी किती छेडछाड करून चित्रपट बनवला? त्यांच्या कथांचा सार जितका टिकवून ठेवता येणे शक्य आहे, तितके केेले आहे. त्याचे जास्त विकृतीकरण केले नाही. अगदी बेटी डेव्हिस आणि मॅगी स्मिथ यांनी ७०च्या दशकात समान शीर्षकासह समान कथा चित्रित केली होती. मात्र आम्ही या वेळी यात बदल केले आहेत. माझी भूमिका मुळात जॉर्ज केनेडी यांनी केली होती.

बॉलीवूडमध्ये तू तिग्मांशू धुलियासोबत ‘मिलन टॉकीज’मध्ये काम केले. त्याच्या अपयशाचे कारण काय होते ?
तिग्मांशू सर माझे गुरू आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकलो. ‘मिलन टॉकीज’ चालली नाही. ती कहाणी सरांना खूप आवडत होती. खरं तर, या चित्रपटाच्या मार्केटिंगसाठी ज्या लाेकांशी संपर्क केला होता त्यांनीच धोका दिला. कमी आम्हीच कमी पडलो, काही तरी झाले. इतर कारणे आहेत. बाकी तो चित्रपट माझ्यासोबत आयुष्यभर राहील. आता ‘द ग्रेट इंडियन मर्डर’मधून तिग्मांशू सरांचे नवे व्हर्जन आले आहे. मी आणि ऋचाने ‘फुकरे’मध्ये काम केले, पण त्याला मोजत नाही.

गुप्तहेर हरक्युल प्यारोच्या मिशा विशिष्ट प्रकारच्या आहेत. त्यांनी ती तशी डिझाइन का केली ?

हरक्युल प्यारो नेहमी युद्धात असतो. तो एक सैनिक आहे. एकदा एका स्फोटात त्याच्या नाकाला मार लागला होता. त्यात तो जखमी झाला होता. नाकाच्या खालची जागा फाटलेली आहे. त्यामुळे ते झाकण्यासाठी त्यांच्या मिशा तसा डिझाइन केल्या आहेत. योगायोगाने हे कारण चित्रपटात सांगितले गेले.

गेल गॅडोटसारख्या बड्या अभिनेत्रींचा दृष्टिकोन कसा होता ?
नेहमी दैनंदिन कामाविषयी चर्चा करायचो. सेटवर आम्ही बरेच कलाकार सोबत राहायचो. मी सर्वांचे निरीक्षण करायचो. त्यांचे छोट्या-छोट्या गोष्टीवर लक्ष असते. सर्वच आपल्या कामात पारंगत आहेत. रसेल ब्रँड, जेनिफर साँडर्स, केनेथ ब्रानघ इतरही सर्वच दिग्गज लोक आहेत. कॅनेथच्या ‘बेलफास्ट’ला यंदा सात ऑस्कर श्रेणीत नामांकन मिळाले. त्यांच्यासारख्या गुरूंची कलाकुसर पाहण्याची संधी मला इतक्या जवळून मिळाली हे भाग्यच म्हणावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...