आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आलिया भट्ट आणि वरुण धवन यांच्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट दोन्ही कलाकारांसाठी मैलाचा दगड ठरला आहे. त्यानंतर ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ आला. हे दोन्ही चित्रपट बॉलिवूडप्रेमींना खूपच आवडले होते. आता शशांक खैतान याचा तिसरा भाग आणण्याचा विचार करत आहेत. आलियाने आपल्या सोशल मीडियावर चाहत्यांना याविषयी हिंट दिली आहे. तिने एक फोटो शेअर करत लिहिले..., आम्ही येथे फारच गुप्तपणे पार्ट 3 वर चर्चा करत आहोत. चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आम्ही ते साजरे करत आहोत.
2. ‘बंटी और बबली 2’ पाहण्याची मजा थिएटरमध्येच : शर्वरी
सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ अभिनीत ‘बंटी और बबली 2’ 23 एप्रिल रोजी रिलीज हाेणार आहे. याविषयी शर्वरी म्हणाली, एक अभिनेत्री म्हणून मी पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. आता ती वेळ आली आहे, असे मला वाटते. या चित्रपटासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. हा चित्रपट पाहण्याची मजा चित्रपटगृहातच आहे. सहकुटुुंब पाहावा असा हा चित्रपट आहे.
3. सर्वकाही सुरळीत झाले तर 2-3 महिन्यांत आम्ही लग्न करू
'बिग बॉस 14’ चा रनरअप राहुल वैद्य लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नुकतेच त्याने एका मुलाखतीत सांगितले. तो म्हणाला, काही लोक करिअर माइंडेड असतात पण मी फॅमिली मॅन आहे. माझ्यासाठी माझे कुटंंुब खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्यासोबतच आयुष्यभर राहण्याचा मी विचार करत आहे. मला पहिल्यापासून एक घरगुती जोडीदार हवी होती आणि ती आता मिळाली आहे. ती दिशा आहे. दिशालादेखील कुटुंब आवडते. आमच्या दोघांचा स्वभाव सारखाच आहे. त्यामुळेच आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम केले. आमचे कुटुंबही एकमेकांना भेटले आहे. त्यांनी लग्नाची बोलणीदेखील सुरू केली आहे. सध्या तरी तारीख ठरली नाही. यावर चर्चा सुरू आहे. राहुल वैद्य आणि त्याची गर्लफ्रेंड एका लग्न समारंभात भाग घेणार आहेत.
4. अहान शेट्टीने पूर्ण केले ‘तडप’ सिनेमाचे शूटिंग
सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टीने आपल्या पहिल्या ‘तडप’ या बॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट या वर्षी 24 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. अहानने बुधवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना लिहिले, “माझ्या पहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले. मी या आठवणी नेहमीसाठी कैद करू इच्छित आहे. ‘तडप’च्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो. ज्यांनी मला खूप सहकार्य केले.’ मिलान लुथरिया दिग्दर्शित हा चित्रपट अहानसह तारा सुतारिया, सौरभ शुक्ला आणि कुमुद मिश्रा यांच्या मुख्य भूमिकेने सजलेला आहे.
5. गायक अरिजित सिंह आता संगीतकाराच्या भूमिकेत
गायक अरिजित सिंह आता संगीतकार झाले आहेत. संगीतकार म्हणून त्यांचा पहिला चित्रपट सान्या मल्होत्रा स्टारर चित्रपट ‘पगलेट’ आहे. अरिजित यांनी याबाबतची माहिती देण्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिले आहे, ‘पगलेट’ चित्रपटासाठी संगीतकार म्हणून काम करणे त्यांना गर्वाचे वाटत आहे. मी हा अल्बम ए. आर. रहमान यांना अर्पण करतो. ज्यांनी मला भारतीय क्लासिकल संगीत शिकवले. मला त्यांच्यापासून कायम प्रेरणा मिळते. मी निर्माते गुनीत मोंगा यांच्या म्हणण्यावरून या चित्रपटाच्या गाण्यासाठी संगीत दिले. ‘पगलेट’ चित्रपट 26 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.