आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआलिया भट्टने रविवारी मुलीला जन्म दिला. आलियाची प्रसूती मुंबईच्या आर एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये झाली. 14 एप्रिल 2022 रोजी आलियाने अभिनेता रणबीर कपूरशी लग्न केले. आलिया वयाच्या 29 व्या वर्षी आई झाली आहे. आलिया आई बनणाऱ्या सर्वात तरुण अभिनेत्रीच्या यादीत सामील झाली आहे. चला जाणून घेऊया, आलिया व्यतिरिक्त कोणकोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाच्या कमी वयात गुड न्यूज दिली -
डिंपल कपाडिया
एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी राजेश खन्ना यांच्याशी लग्न केले. लग्नाच्या पुढच्याच वर्षी 1974 मध्ये त्यांची लेक ट्विंकल खन्नाचा जन्म झाला.
नीतू कपूर
नीतू कपूर यांनी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी ऋषी कपूरसोबत प्रेमविवाह केला होता. लग्नाच्या पुढच्याच वर्षी नीतू यांनी मुलगी रिद्धिमा कपूरला जन्म दिला. एका वर्षानंतर 1982 मध्ये त्यांचा मुलगा रणबीरचा जन्म झाला. पहिल्या मुलीच्या जन्माच्या वेळी नीतू अवघ्या 22 वर्षांच्या होत्या.
भाग्यश्री
'मैंने प्यार किया' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री भाग्यश्रीने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी अभिमन्यू दासानीला जन्म दिला. 'मैने प्यार किया' या चित्रपटानंतर भाग्यश्रीने वयाच्या 21 व्या वर्षी 1990 मध्ये हिमालय दासानीशी लग्न केले होते.
काजोल
काजोलने वयाच्या 29 व्या वर्षी मुलगी न्यासाला जन्म दिला. काजोलने 1999 मध्ये अजय देवगणसोबत लग्न केले, त्यानंतर 3 वर्षांनी 2003 मध्ये न्यासाचा जन्म झाला.
जया बच्चन
1973 मध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न झाले होते. लग्नाच्या वर्षभराने म्हणजे 1974 मध्ये जया यांनी श्वेता बच्चनला जन्म दिला. त्यावेळी जया फक्त 26 वर्षांच्या होती. यानंतर दोन वर्षांनी जया-अमिताभ यांना मुलगा अभिषेकचा जन्म झाला.
सारिका
श्रुती हासनचा जन्म 1986 मध्ये झाला, त्यावेळी तिची आई सारिका अवघ्या 26 वर्षांच्या होत्या. आई बनल्यानंतर दोन वर्षांनी सारिका यांनी श्रुतीचे वडील कमल हासन यांच्याशी लग्न केले होते.
नीना गुप्ता
नीना गुप्ता यांनी 1989 मध्ये मुलगी मसाबा गुप्ताला जन्म दिला. मसाबा ही नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. दोघांचेही लग्न झाले नव्हते, असे असूनही नीना यांनी त्यांच्या मुलीला जन्म दिला. त्यावेळी नीना 30 वर्षांच्या होत्या. विवियन आधीच विवाहित असल्याने नीना यांनी सिंगल मदर बनून आपल्या मुलीचे संगोपन केले.
करीना कपूर खान
करीना कपूर खानने 2014 मध्ये मुलगा तैमूरला जन्म दिला. त्यावेळी ती 32 वर्षांची होती. करीनाने 2012 मध्ये सैफ अली खानशी लग्न केले.
करिश्मा कपूर
90 च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या करिश्मा कपूरने 2005 मध्ये मुलगी समायराला जन्म दिला. त्यावेळी ती 31 वर्षांची होती. करिश्माने 2003 मध्ये बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले होते. 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
रवीना टंडन
रवीना टंडनने वयाच्या 21 व्या वर्षी छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतले होते. त्यावेळी रवीना अविवाहित होती. रवीनाने 2004 मध्ये बिझनेसमन अनिल थडानीसोबत लग्न केले, त्यानंतर 2005 मध्ये रवीनाने मुलगी साशाला जन्म दिला. यावेळी रवीना 31 वर्षांची होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.