आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलिया भट्ट-रणबीर कपूर यांनी मुलीचं नाव ठेवलं 'Raha':नीतू कपूर यांनी केलं नामकरण, प्रेमळ आहे नावाचा अर्थ

2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या मुलीच्या नावाचा खुलासा केला आहे. आलिया-रणबीरने त्यांच्या मुलीचे नाव राहा ठेवले आहे. हे नाव नीतू कपूर यांनी निवडले आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी आपल्या मुलीच्या नावाचा अर्थही प्रत्येक भाषेत सांगितला आहे.

आलिया भट्टने शेअर केलेल्या फोटोमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या बाळाला हातात धरून बसलेले दिसत आहेत. राहाच्या नावाची जर्सी भिंतीवर टांगलेली दिसत आहे. हा फोटो तिच्या इंस्टावर पोस्ट करत आलिया भट्टने एक गोंडस कॅप्शन लिहिले आहे.आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा विवाह याचवर्षी १४ एप्रिल रोजी झाला होता. लग्नाच्या जवळपास 2 महिन्यांनंतर आलियाने सोशल मीडियावर आई झाल्याची गोड बातमी शेअर केली. आता 7 नोव्हेंबरला आलियाने एका मुलीला जन्म दिला. तेव्हापासून आलिया आणि रणबीर आपल्या मुलीचे नाव काय ठेवणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती.

आलिया भट्ट लिहिले की, "मुलीचे राहा हे नाव तिच्या आजीने निवडले आहे, या नावाचा सुंदर अर्थ आहे... राहा म्हणजे एक दिव्य पथ, स्वाहिलीमध्ये याचा अर्थ आनंद, संस्कृतमध्ये याचा अर्थ गोत्र आहे... बंगालीमध्ये याचा अर्थ आराम तर अरबी भाषेत याचा अर्थ शांती, आनंद, स्वातंत्र्य.. आपल्या मुलीच्या नावाचे पहिले अक्षर आम्ही सर्वांना अनुभवलं... धन्यवाद राहा..आमच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी.. असे वाटत आहे की, आम्ही आता जीवन जगायला सुरुवात केली आहे.

आलियाने तिच्या गरोदरपणात कामापासून ब्रेक न घेता काम केलं. तिने आधी 'हार्ट ऑफ स्टोन'चे शूटिंग पूर्ण केले. त्यानंतर ती तिच्या प्रोडक्शन हाऊसच्या 'डार्लिंग' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाली आणि नंतर 'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनमध्ये ती बिझी दिसली.
आलियाने तिच्या गरोदरपणात कामापासून ब्रेक न घेता काम केलं. तिने आधी 'हार्ट ऑफ स्टोन'चे शूटिंग पूर्ण केले. त्यानंतर ती तिच्या प्रोडक्शन हाऊसच्या 'डार्लिंग' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाली आणि नंतर 'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनमध्ये ती बिझी दिसली.

याच वर्षी 14 एप्रिलला झाले रणबीर-आलियाचे लग्न

रणबीर आणि आलियाने यावर्षी 14 एप्रिल रोजी कुटुंबीय आणि काही खास मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. 2017 मध्ये 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या सेटवर भेटल्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. 5 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या जवळपास 2 महिन्यांनंतर आलियाने सोशल मीडियावर आई होणार असल्याची गोड बातमी शेअर केली होती. आता 7 नोव्हेंबरला आलियाने एका मुलीला जन्म दिला आहे. तेव्हापासून आलिया आणि रणबीर आपल्या मुलीचे नाव काय ठेवणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती.

आलियाला चारित्र्य प्रमाणपत्र मागणारे

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या घरी एक छोटी पाहुणी आली आहे. प्रसंग आनंदाचा असेल तर आनंदाची चर्चा व्हायला हवी. पण त्या चिमुकलीच्या जन्मानंतर अवघ्या काही तासांत गुगल, ट्विटरसह संपूर्ण सोशल मीडियावर काय ट्रेंड होत होते, हे तुम्हाला देखील ठाऊक आहे. आलिया भट्टचे लग्न आणि त्यानंतर तिची डिलिव्हरी डेट. 7 महिन्यांत बाळाचा जन्म. आलिया भट्ट लग्नाआधी प्रेग्नंट होती का? अर्थात ही चर्चा काय म्हाताऱ्या बायका, आजी आजोबा, नाना नानी करत नव्हते. तर सोशल मीडियावर 'रेस्पेक्ट वुमन', हॅशटॅग 'सेव्ह डॉटर', हॅशटॅग 'जेंडर इक्वॅलिटी' या नावाने दिवसाला 42 टि्वट करणाऱ्यांकडून केले जात होते. आलिया भट्टच्या शेवटच्या पिरियडच्या तारखेपासून, तिने कधी सेक्स केला, ती कधी प्रेग्नंट झाली, मग तिचे लग्न कधी झाले आणि तिने बाळाला कधी जन्म दिला, या सगळ्यांचा हिशोब नेटकऱ्यांना हवा होता. येथे वाचा पुर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...