आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलियाचा पुढाकार:रणबीर कपूर चॅरिटीसाठी आपले कपडे करणार डोनेट, आलियाने सोशल मीडियावर शेअर केली बातमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आलिया 2017 पासून सामाजिक कार्यात सक्रिय आहे

अभिनेत्री आलिया भट्ट सामाजिक कार्यातही पुढे असते. अलीकडेच तिने तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता रणबीर कपूर आपले कपडे चरिटीसाठी देणार असल्याचे जाहीर केले आहे. रणबीरच्या वॉर्डरोबच्या वस्तूंच्या विक्रीतून जे पैसे उभे होतील त्यातून कर्करोगाने ग्रस्त असलेल्या लहान मुलांना पौष्टिक आहार दिला जाईल. या कामासाठी आलियाची संस्था सहकार्य करेल. आलियाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती शेअर केली आहे.

रणबीरचा फोटो शेअर करताना आलियाने लिहिले- 'रणबीर आपले वॉर्डरोब तुमच्याबरोबर शेअर करत आहे. कर्करोगाशी लढा देणा-या मुलांना पोषक आहार देण्यासाठी पुढील कार्य केले जाईल. या कामात कडल्स फाउंडेशन मदत करेल.'

2017 मध्ये आलियाने इकोलॉजिकल इनिशिएटिव्ह को-एक्जिस्ट सुरू केले होते. ही संस्था प्राणी आणि पर्यावरणावर काम करते.

रणबीर आणि आलिया लवकरच अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. हे दोघे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. त्यांच्यासह अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वाची भूमिका या चित्रपटात आहे.

बातम्या आणखी आहेत...