आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने आता करिअरमध्ये एक पाऊल पुढे टाकले आहे. आलिया आता निर्मातादेखील बनली आहे. तिने मुंबईत स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरु केले आहे. याबाबतची माहिती आलियाने स्वत: तिच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे दिली आहे. तिने आपल्या प्रॉडक्शन कंपनीचे काही फोटो आणि पोस्टर शेअर केले आहेत. 'इटरनल सनशाईन' असे आलियाच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव असून कंपनीचा लोगो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
प्रॉडक्शन हाऊसची घोषणा करताना खूप आनंद झाला
आलियाने पोस्टर शेअर करुन लिहिले, 'मला प्रोडक्शन हाऊसची घोषणा करताना आनंद होतोय. चला आम्हाला काही कथा सांगू द्या, काही आनंदी, काही उबदार, काही सत्य कथा,' अशा आशयाचे कॅप्शन तिने या व्हिडिओला दिले आहे. आगामी काळात आलिया अभिनयासोबत चित्रपटांची निर्मिती करताना दिसणार आहे.
आलियाची आई म्हणाली- शुभेच्छा, सुपर डुपर अभिमान
आलियाच्या पोस्टवर कमेंट करताना तिची आई सोनी राजदान यांनी लिहिले, "अभिनंदन, सुपर डुपर अभिमान." सोनी यांच्या व्यतिरिक्त करण जोहर, अपूर्व मेहता, रकुलप्रीत सिंग यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करुन आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत.
आलियाच्या प्रॉडक्शन हाऊसचे ऑफिस मुंबईतील जुहू भागात आहे. आलियाच्या या ऑफिसची सजावट रूपिन सूचक यांनी केले आहे. रुपिनने 2 जून 2020 रोजी आलियाच्या ऑफिसचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
2019 मध्ये व्यक्त केली होती प्रॉडक्शन हाऊस सुरु करण्याची इच्छा
आलियाने 2019 मध्ये ती लवकरच स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस सुरु करेल असे सांगितले होते. आलियाने शेअर केलेल्या लोगोमध्ये कंपनीच्या नावासोबत मांजरीचे कार्टून आहे. आलिया प्राणीप्रेमी असून तिला मांजरी आवडतात. म्हणून तिने कंपनीच्या लोगोमध्ये मांजरीचे कार्टुन वापरले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.