आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका चूक उत्तराने डंब गर्लचा शिक्का:आलियावर सर्वाधिक जोक्स, पण आज यशस्वी अभिनेत्री; एका चित्रपटासाठी घेते 15-20 कोटी

लेखक: ईफत कुरैशी7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शो- कॉफी विथ करण, वर्ष 2013 आणि गेस्ट होते आलिया भट्ट, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा. करणने आलियाला प्रश्न विचारला- भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? आलियाने लगेच उत्तर दिले - पृथ्वीराज चव्हाण. बस हे उत्तर आले आणि सोशल मीडियावर गोंधळ सुरू झाला. आलियाबद्दल विनोद बनायला लागले. ती एकमेव अभिनेत्री आहे जिच्यावर हजारो विनोद बनले आणि तिच्यावर डंब(बेवकूफ) असल्याचा टॅग लावला गेला.

इतक्या ट्रोलिंगनंतर कुणीही नर्व्हस झाले असते, पण आलियाने यालाच आपले शस्त्र बनवले. लोक तिला ट्रोल करत होते. ती एकाहून एक चित्रपटांची निवड करत होती. 10 वर्षांच्या करिअरमध्ये आलियाने अनेक यशस्वी चित्रपट दिले. महिला केंद्रित चित्रपटांची ती आतापर्यंतची सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. तिच्या नावे राजी, गंगूबाई काठियावाडी, डार्लिंग्स आणि हायवेसारखे चित्रपट आहेत.

आलियाने आपल्या निर्णयांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले. जेव्हा स्टुडंट ऑफ द इअरसाठी ऑडिशन सुरू होते तेव्हा ती शाळेच्या गणवेशातच ऑडिशन द्यायला गेली होती. करिअरच्या शिखरावर रणबीर कपूरसोबत लग्न केले. 29 वर्षांच्या वयातच आई बनली. पहिल्या चित्रपटासाठी आलियाला 15 लाख रुपये फीस मिळाली होती. आज ती एका चित्रपटासाठी 15 ते 20 कोटी रुपये घेते.

आज आलियाच्या 30 व्या वाढदिवसाला वाचा, एक डंब मुलगी ते सर्वात यशस्वी अभिनेत्री बनण्याचा तिचा प्रवास...

लहानपणापासूच हिरोईन व्हायची इच्छा होती

आलिया भट्टचा जन्म 15 मार्च 1993 रोजी मुंबईत झाला. ती महेश भट्ट आणि त्यांची दुसरी पत्नी सोनी राजदान यांची कनिष्ठ कन्या आहे. महेश हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते तर आई त्यांच्या काळातील सर्वात मोठ्या अभिनेत्री होत्या. सावत्र बहीण पूजा भट्टही 90 च्या दशकातील हिट अभिनेत्री होती.

घरात चित्रपटांच्या वातावरणाचा आलियावर खोल प्रभाव होता. त्यामुळे लहानपणापासूनच हिरोईन बनायचे तिचे स्वप्न होते. किंडरगार्डन स्कूलमध्ये एका नाटकाच्या सरावादरम्यान आलियाने हिरोईन बनण्याचा निर्णय घेतला होता.

जीना इसी का नाम है, या टीव्ही शोच्या 32 व्या भागात सुमारे 8-9 वर्षांची आलिया वडील महेश भट्ट यांना पाठिंबा द्यायला आली होती. तिथे ती माईकवर म्हणाली होती की तिला अभिनेत्री व्हायचे आहे. दृढनिश्चयी आलियाचा निर्धार खरा ठरला आणि आज ती बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री आहे.

सौजन्य - झी टीव्ही, शो जीना इसी का नाम है
सौजन्य - झी टीव्ही, शो जीना इसी का नाम है

आईने एकटीने संगोपन केले, वडील महेश यांच्याशी चांगले संबंध नव्हते

महेश भट्ट आणि सोनी राजदान यांच्या नात्यात एका कालावधीदरम्यान कटुता आली होती. तेव्हा सोनी यांनी एकटीनेच मुलींचे संगोपन केले. महेश हे सोनी आणि त्यांच्या मुलींकडे जास्त लक्ष देत नव्हते. एका मुलाखतीत आलियाने सांगितले होते की, तिला लहानपणी वडिलांची आठवण यायची. कारण ते तिच्यासोबत नव्हते. अनेक वर्षे वेगळे राहिल्यानंतर आलिया जेव्हा चित्रपटांत आली तेव्हा तिचे वडिलांशी नाते सुधारायला लागले.

5 वर्षांच्या वयात पहिला चित्रपट मिळाला

आलिया भट्टने महेश भट्ट यांच्या निर्मिती संस्थेच्या 1999 मधील संघर्ष या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केले होते. चित्रपटात आलियाने प्रिती झिंटाच्या बालपणीची काही सेकंदांची भूमिका केली होती. आलिया सेटवर केवळ यासाठीच जायची, कारण तिथे तिला चांगले जेवण मिळायचे.

9 वर्षांची असताना भन्साळींच्या चित्रपटासाठी रिजेक्ट झाली

आलियाने 9 वर्षांची असताना संजय लीला भन्साळींचा चित्रपट ब्लॅकसाठी ऑडिशन दिले होते. मात्र तिला रिजेक्ट करण्यात आले होते. नंतर ही भूमिका आएशा कपूरला मिळाली होती. या चित्रपटासाठी आएशाला 7 पुरस्कार मिळाले होते.

12 वर्षांची असताना रणबीरसह पदार्पण केले

ब्लॅक चित्रपटासाठी रिजेक्ट झाल्यानंतर संजय लीला भन्साळींनी 12 वर्षांच्या आलियाला बालिका वधू चित्रपटासाठी कास्ट केले. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूरला कास्ट करण्यात आले होते. काही महिन्यांतच हा चित्रपट बंद झाला.

12 वी पूर्ण न करताच शिक्षण सोडले

आलिया भट्टला नेहमीपासूनच अभिनेत्री व्हायची इच्छा होती. यासाठी तिने 12 वीतच शिक्षण सोडले आणि चित्रपटांत काम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

लेट नाईट पार्टी केल्यावर वडील रागावले

किशोरवयात आलिया भट्ट खूप पार्टी करायची. एकदा 16-17 वर्षांची असताना आलिया खोटे बोलून लेट नाईट पार्टीतून घरी आली होती. वडील महेश भट्ट यांना हे कळताच ते आलियाला खूप रागावले. म्हणाले की चित्रपटांत काम करणे हे खूप गंभीर काम आहे. अशी वर्तणूक राहिली तर काहीही करू शकणार नाही.

500 मुलींत शाळेचा गणवेश घालून ऑडिशनला गेली होती आलिया

आलिया भट्टला भलेही नेपोटिझमच्या नावे ट्रोल केले जात असेल, मात्र तिला स्टुडंट ऑफ द इअर हा चित्रपट ऑडिशनद्वारेच मिळाला होता. आलिया तेव्हा 19 वर्षांची होती आणि तिची परीक्षा सुरू होती. तिला या चित्रपटासाठी ऑडिशनची माहिती मिळाल्यावर ती थेट करण जोहरच्या कार्यालयात गेली. तिथे आधीच 500 मुलींची ऑडिशन झाली होती. आलियाने शाळेच्या गणवेशातच चित्रपटासाठी ऑडिशन दिले. ऑडिशनमध्ये आधुनिक धाटणीच्या आलियाला बहारा-बहारा गाण्यावर नृत्य करताना बघून करण जोहर चांगलेच प्रभावित झाले होते.

करणच्या सांगण्यावरून 16 किलो वजन घटवले

आलियाच्या अभिनयावर करण खूश होते, पण तेव्हा आलियाचे वजन 68 किलो होते आणि ती स्थूल होती. करण यांनी तेव्हा आलियाला म्हटले की जर तिने 16 किलो वजन घटवले तर तिला चित्रपटात घेतले जाईल. आलियाने 3 महिन्यांतच हे करून दाखवले, त्यानंतर तिला चित्रपट मिळाला होता.

आलिया हिरोईन बनल्यावर सिद्धार्थ मल्होत्राने घेतला होता आक्षेप

वजन घटवल्यानंतर आलिया पुन्हा शाळेच्या गणवेशात करण जोहरच्या कार्यालयात गेली होती. तिथे चित्रपटातून पदार्पण करणारा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही उपस्थित होता. शाळेच्या गणवेशात आलेली मुलगी चित्रपटाती हिरोईन असल्याचे ऐकल्यानंतर त्यालाही धक्का बसला. तो करण जोहरकडे जाऊन म्हणाला की, हिला हिरोईन बनवायचे आहे यावर तुम्हाला विश्वास आहे का? तेव्हा त्याला कळाले की आलिया भट्ट ही महेश भट्ट यांची कन्या आहे.

पहिल्या चित्रपटासाठी मिळाली 15 लाख रुपये फीस, आईला दिली

आलिया भट्टला धर्मा प्रॉडक्शनचा चित्रपट स्टुडंट ऑफ द इअरसाठी 15 लाख रुपये फीस मिळाली होती. ही रक्कम तिने आई सोनी राजदान यांना दिली होती. तेव्हापासून सोनीच तिचा फायनान्स बघते.

रात्री 3 वाजता बॉडीगार्ड नशेत घ्यायला आला तेव्हा

आलिया भट्ट एकदा सिद्धार्थ मल्होत्राला भेटायला त्याच्या घरी गेली होती. आलियाने बॉडीगार्डला घराबाहेरच थांबायला सांगितले होते. मात्र ती निघाली तेव्हा तो तिथे नव्हता. आलियाने अनेक वेळा कॉल केल्यावर उत्तर मिळाले नाही. असेच रात्रीचे 3 वाजले. बॉडीगार्ड आला तेव्हा आलिया घरातून निघाली. मात्र बॉडीगार्ड जसे बोलायला लागला, तिला कळाले की तो नशेत आहे. भीतीने आलिया काही म्हणाली नाही. मात्र घरी पोहोचताच आईकडे तक्रार केली. सोनी यांनी रागात त्याला लगेच नोकरीवरून काढून टाकले.

चित्रपटात येताच आई-वडिलांचे घर सोडले

करिअर स्थिर होताच आलियाने आपल्या पालकांचे घर सोडले आणि घर खरेदी करून बहीण शाहीन भट्टसोबत राहायला लागली. प्रायव्हसीसाठी तिने हा निर्णय घेतला होता.

कॉफी विथ करणमध्ये चुकीचे उत्तर दिल्याने डंब गर्लचा शिक्का

2013 मध्ये आलिया भट्ट कॉफी विथ करणच्या चौथ्या सीझनमध्ये वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रासह पोहोचली होती. यावेळी रॅपिड फायर राऊंडदरम्यान करण जोहरने विचारले होते की भारताचे राष्ट्रपती कोण आहेत. आलियाने ओरडत उत्तर दिले पृथ्वीराज चव्हाण. तेव्हा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी होते. सोबत बसलेला सिद्धार्थ आश्चर्यचकित झाला, तर करणची हसून हसून पुरेवाट लागली होती. योग्य उत्तर कळाल्यानंतरही आलियाने अजब तर्क देत म्हटले होते की, दोघांचे नाव P ने सुरू होते.

IQ वरून थट्टा झाल्यावर स्वतः व्हिडिओ बनवला

आलियाच्या IQ विषयी देशभरात खूप थट्टा-विनोद झाले आणि तिच्यावर मीम्स बनायला लागले. पत्रकार मालविका संघवींनी एका लेखात आलियाला डंब ब्लॉन्ड स्टिरिओटाईप म्हटले.

2015 मध्ये आलियाने एआयबीच्या यूट्यूब चॅनलसाठी ट्रोलिंगवर आलिया भट्टःजिनियस ऑफ द इअर हा व्हिडिओ बनवला. हा एक सटायर व्हिडिओ होता. यात आलियाने स्वतःचीच थट्टा उडवली होती.

नॉन ग्लॅमरस भूमिकेने बदलली डंब गर्ल इमेज

2014 मध्ये आलिया हायवे चित्रपटात दिसली होती. चांगल्या अभिनयासाठी तिला क्रिटिक्स बेस्ट अॅक्ट्रेस फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ग्लॅमरस आलियाला नॉन ग्लॅमरस भूमिकेत पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. नंतर 2 स्टेटस, हंप्टी शर्मा की दुल्हनिया, कपूर अँड सन्स, उडता पंजाब, डिअर जिंदगी, बद्रीनाथ की दुल्हनिया, राजी अशा चित्रपटांच्या माध्यमातून आलियाने स्वतःला आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रस्थापित केले. तिच्या स्क्रिप्ट निवडीचेही खूप कौतुक झाले.

बिहारी मुलगी बनण्यासाठी मोबाईल सोडला

2016 मध्ये आलिया उडता पंजाब चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने गावातील बिहारी मुलीची भूमिका साकारली होती. वॉगला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले होते की, पात्राशी एकरूप होण्यासाठी तिने मोबाईलपासून दूर राहत बिहारी भाषा शिकली होती. पंकज त्रिपाठींनी तिला मदत केली होती.

या चित्रपटांत अभिनयाची खोल छाप सोडली

राजी चित्रपटात आलियाने सहमत खान नावाच्या अंडरकव्हर एजंटची भूमिका साकारली होती. डिअर जिंदगीनंतरचा हा तिच्या करिअरमधील दुसरा महिला केंद्रित चित्रपट होता. चित्रपटासाठी आलियाने कोडिंग आणि शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. चित्रपटासाठी आलियाला सर्वोत्तम अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

यानंतर आलियाचा दमदार अभिनय गंगूबाई काठियावाडीमध्ये बघायला मिळाला होता. लोकांनी सुरुवातीला चित्रपटाच्या कास्टिंगवर खूप प्रश्न उपस्थित केले होते. मात्र नंतर जेव्हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा समीक्षकांनी आलियाच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक केले. कोरोनाकाळात रिलीज झालेल्या या चित्रपटाने 209 कोटींचे कलेक्शन केले होते. 2022 मधील डार्लिंग्स आलियाच्या करिअरमधील चौथा महिला केंद्रित चित्रपट ठरला होता. हे चारही चित्रपट सुपरहिट ठरले.

आलियाचा चित्रपट लागल्यावर पाकिस्तानी अभिनेत्याने थिएटर बूक केले

2021 मध्ये आलियाचा चित्रपट गंगूबाई काठियावाडी प्रदर्शित झाल्यावर त्याची चर्चा पाकिस्तानातही होती. पाकिस्तानी अभिनेता मुनीब बट्टने पत्नीसह चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरच बूक केले होते. तर एका चाहत्याने पनीरच्या तुकड्यांवर गंगूबाईचे पोर्ट्रेट बनवले होते.

कशी बनली रणबीरची दुल्हनिया?

रणबीर कपूरशी लग्न हा आलियाच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या निर्णयांपैकी एक होता. आता योगायोग होता की आलियाचा निर्धार पक्का होता, कारण अनेक वर्षांपूर्वी आलियाने रणबीर तिचा क्रश आणि स्वयंवर कँडिडेट असल्याचे म्हटले होते. कपूर घराण्यातील सुना लग्नानंतर चित्रपटांपासून दूर झाल्या, हे माहिती असूनही आलिया मागे हटली नाही. तेही करिअर शिखरावर असताना.

तथापि, आता कपूर घराण्याचे सुनांसाठीचे नियम बदलले आहेत. कारण आलियाकडे सध्या रॉकी और रानी की प्रेम कहानी, ब्रह्मास्त्र 2 आणि हार्ट ऑफ स्टोनसारखे मोठे चित्रपट आहेत. दोघांनी 14 एप्रिल 2022 रोजी लग्न केले होते. त्यांची प्रेमकथा ब्रह्मास्त्रच्या सेटवरून सुरू झाली, मात्र पहिली भेट आलिया 9 वर्षांची असताना झाली होती. एक नजर त्यांच्या लव्ह स्टोरीवर -

9 वर्षांच्या आलियाची रणबीरशी पहिली भेट, तेव्हापासून क्रश

आलिया आणि रणबीरची पहिली भेट ब्लॅक चित्रपटाच्या सेटवर झाली होती. 9 वर्षांची आलिया ऑडिशन द्यायला आली होती. तर रणबीर चित्रपटात संजय लीला भन्साळींचा सहायक दिग्दर्शक होता. दोघांनी एकमेकांना बघितल्यावर बोलणे झाले नव्हते. मात्र आलियाला रणबीर खूप आवडला होता. ती त्याला क्रश मानायला लागली होती. याचा खुलासा स्वतः आलियाने कॉफी विथ करणमध्ये केला होता.

शो मध्ये करणने आलियाला विचारले होते की स्वयंवरमध्ये कोणत्या अभिनेत्याला कँडिडेट बनवणार, तेव्हा आलियाने पहिले नाव रणबीरचेच घेतले होते. कोणत्या अभिनेत्यासोबत हॉट सीन देण्यात कसलिही हरकत नाही असे विचारल्यावरही आलियाने रणबीरचे नाव घेतले होते.

दोघांची मैत्री नव्हती, मात्र चित्रपटाचे प्रमोश आणि कार्यक्रमांत त्यांची भेट व्हायची. आलियाचा चित्रपट शानदारच्या प्रीमियरमध्ये रणबीर आला होता. दोघांना ऐ दिल है मुश्किलमध्ये एकत्र काम करण्याची संधी मिळाली होती. रणबीर चित्रपटातील प्रमुख कलाकार होता, तर आलियाने ब्रेकअप गाण्यात कॅमिओ केला होता.

कशी सुरू झाली लव्हस्टोरी

ब्रह्मास्त्रच्या चित्रीकरणादरम्यान दोघांची मैत्री झाली. सोबत काम करताना दोघांची मैत्री आधी अधिक घट्ट झाली, नंतर एका विमान प्रवासादरम्यान दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली. दोघे प्रथम सोनम कपूरच्या लग्नात जोडप्याच्या रुपाने सहभागी झाले आणि त्यांच्या कथित नात्यावर शिक्कामोर्तब झाले. आलियाने नेहमीच नात्यावर मौन बाळगले होते मात्र रणबीरने एका मुलाखतीदरम्यान नात्यावर शिक्कामोर्तब केले. नंतर आलियानेही कलंकच्या प्रमोशनल मुलाखतीत वरुणला चुकून रणबीर म्हणून हाक मारली, यामुळे त्यांचे नाते चर्चेत आले.

2018 मध्ये ऋषी कपूर उपचारांसाठी न्यूयॉर्कला गेल्यावर आलियाही रणबीरसह त्यांना भेटायला गेली. 2019 मध्ये न्यू इअर सेलिब्रेशनदरम्यान नीत कपूर यांनी एक फोटो शेअर केला होता. यात रणबीर, आलिया, ऋषी कपूर, नीतू आणि रिद्धिमा एकत्र दिसले होते.

2019 मध्ये फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात दोघांनी एकमेकांवर प्रेम करत असल्याची कबुली दिली होती. आलियाला राजी चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्याव तिने मंचावरूनच रणबीरला आय लव्ह यू म्हटले होते.

सप्टेंबर 2019 मध्ये आलिया-रणबीर सीक्रेट व्हॅकेशनसाठी साऊथ आफ्रिकेला गेले होते. दोघांच्या या व्हॅकेशनचे फोटो खूप व्हायरल झाले होते. याच व्हॅकेशनमध्ये रणबीरने आलियाला प्रपोज केले होते.

14 एप्रिल 2022 रोजी दोघांनी खासगी सोहळ्यात लग्न केले होते. लग्नाच्या 2 महिन्यांनंतर 27 जून 2022 रोजी आलियाने प्रेग्नन्सीची घोषणा केली आणि नोव्हेंबरमध्ये कन्या राहाला जन्म दिला.

2022 मध्ये डार्लिंग्सच्या माध्यमातून निर्मितीत पाऊल

आलिया भट्टने 2022 मधील डार्लिंग्स चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. त्याला खूप पसंती मिळाली. आलियाच्या निर्मिती संस्थेचे नाव इटर्नल्स सनशाइन प्रोडक्शन आहे.

आलिया भट्ट बिझनेस वूमन आहे

प्रत्येक चित्रपटासाठी 15-20 कोटी रुपयांची फीस घेणारी आलिया भट्ट व्यवसायातूनही मोठी कमाई करते. 2013 मध्ये तिने स्टाईल क्रॅकर नावाने स्टार्टअप सुरू केले होते. याशिवाय 2020 मध्ये आलियाने आपली नवी कंपनी सुरू केली होती. याचे नाव अॅड ए मम्मा आहे.

हा एक किडस फॅशन ब्रँड आहे. यात 4-12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी गरजेचे सामान मिळते. 2022 मध्ये आलियाने गरोदर महिलांसाठी एक कलेक्शन लॉन्च केले. एका रिपोर्टनुसार आलियाच्या ब्रँडने 2021 मध्ये 150 कोटींचा व्यवसाय केला होता. आलिया भट्टची नेट वर्थ 189 कोटी रुपये आहे. मुंबईशिवाय लंडनमध्येही आलियाचे घर आहे.

बातम्या आणखी आहेत...