आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 वर्षांची झाली आलिया भट्ट:'स्टुडंट ऑफ द इयर' साठी 400 मुलींमधून झाली होती आलियाची निवड, करण जोहर म्हणाला होता - 'वजन कमी कर किंवा चित्रपटात काम करण्याचे स्वप्न विसर'

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • आलियाचा आज वाढदिवस आहे.

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट आज आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांच्या घरी 15 मार्च 1993 रोजी आलियाचा जन्म झाला. कमी वयात इंडस्ट्रीमध्ये स्वतःची खास ओळख निर्माण करणा-या कलाकारांमध्ये आलियाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.

चित्रपटासाठी तीन आठवड्यात कमी केले होते वजन
नऊ वर्षांच्या छोट्या सिने कारकिर्दीत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारुन आलियाने आपण एक उत्तम अभिनेत्री असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र तिचा हा प्रवास एवढा सहजसोपा नव्हता. 'स्टुडंट
ऑफ द इयर' या पदार्पणातील चित्रपटासाठी आलियाने तीन आठवड्यांत सुमारे 16 किलो वजन कमी केले होते. त्यावेळी तिचे वजन सुमारे 67 किलो होते. आलियासह सुमारे 400 मुलींनी या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. चित्रपटासाठी निवड झाल्यानंतर करण जोहरने आलियाला स्पष्टपणे सांगितले होते की, वजन कमी कर किंवा चित्रपटातील भूमिका विसरून जा.

आलियाच्या जीवनातील रंजक फॅक्ट्स…

 • 'स्टुडंट ऑफ द इयर' हा आलियाचा पहिला चित्रपट नव्हता. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘संघर्ष’ या चित्रपटात आलियाने प्रीती झिंटाचे बालपणीचे पात्र साकारले होते. त्यावेळी ती फक्त 6 वर्षांची होती.
 • आलियाने आपले प्रारंभिक शिक्षण जमनाबाई नर्सरी स्कूल (मुंबई) मधून केले. आलिया ही शाळेत एक सामान्य विद्यार्थिनी होती, परंतु इतर अॅक्टिव्हिटीजमध्ये ती नेहमी पुढे असे. मग ते नृत्य असो वा गाणे असो.
 • आलिया मसाबा गुप्ताची जवळची मैत्रीण असून त्यांच्या गर्ल गँगचे नाव 'स्पाइस गर्ल' आहे. आलियाला पार्टी करणे आणि मित्रांसह बाहेर जाणे आवडते.
 • चित्रपटांव्यतिरिक्त आलिया 'पेटा'शीही संबंधित आहे कारण तिला प्राणी खूप आवडतात.
 • अभिनयाबरोबरच गाण्यातही आपला हात आजमावलेल्या आलियाला संगीत दिग्दर्शक ए.आर. रहमान यांनी वर्ल्ड फेमस म्युझिक स्कूलमध्ये प्रशिक्षण घेण्याची ऑफर दिली होती.
 • अभिनेता इमरान हाश्मी आणि डायटर मोहित सूरी हे तिचे आते भाऊ आहेत.
 • आलियाची आई अर्धी काश्मिरी आणि अर्धी जर्मन आहे. तर तिचे वडील महेश भट्ट हे मुळचे गुजरातचे आहेत. पूजा भट्ट आणि राहुल भट्ट तिचे सावत्र बहीणभाऊ आहेत.
 • आलिया तिच्या आईच्या खूप जवळ आहे. बॉलिवूड करिअरची सुरुवात झाली तेव्हा ती वडिलांच्या जवळ आली. आलियाला तिच्या वडिलांसारखा नवरा नको आहे. याचे कारण असे की तिच्या वडिलांचे आयुष्य अनेकदा वादात राहिले आहे आणि त्यांचे बरेच अफेअर्सही राहिले आहेत. आलिया म्हणते, तिला असा पती हवा आहे जो तिचा मित्र असेल आणि नेहमी तिला आनंदात ठेवेले.
 • आलियाच्या आयुष्यातील तीन महत्त्वाची व्यक्ती म्हणजे तिची आई सोनी राजदान, बहीण शाहीन आणि मेंटॉर करण जोहर.
 • आलियाला गाण्याव्यतिरिक्त चित्रकला देखील खूप आवडते. तिला चारकोल पेंटिंगची आवड आहे.
 • आलिया चांगली झोप तिच्या सौंदर्याचे रहस्य असल्याचे सांगते. ती सकाळी लवकर उठते.
 • आलियाला फ्रेंच फ्राइज खूप आवडतात आणि दिवसा कोणत्याही वेळी ते ती खाऊ शकते.
 • आलियाला ग्रीन टी बरोबर शेंगदाणे खायला आवडतात. मूग डाळीचा हलवा तिचा आवडता पदार्थ आहे.
 • 'स्टुडंट ऑफ द इयर'च्या शूटिंगचा पहिला दिवस हा आलियाच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस होता.
 • आलियाचे भारतातील आवडते ठिकाण म्हणजे हिमाचल प्रदेश.
 • आलियाची लव्ह कम अरेंज मॅरेज करायची इच्छा आहे.
 • 'काम, काम आणि काम' हा आलियाचा सक्सेस मंत्र आहे.
बातम्या आणखी आहेत...