आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्टने मुंबईत नवीन घर विकत घेतले आहे. वृत्तानुसार, हे नवीन घर खरेदी करुन आलिया तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता रणबीर कपूरची शेजारी झाली आहे. 2460 चौरस फूट क्षेत्रातील तिचे हे नवीन घर वांद्रास्थित पाली हिल कॉम्प्लेक्सच्या पाचव्या मजल्यावर आहे. याच इमारतीत रणबीरचे सातव्या मजल्यावर घर आहे. आलियाने तब्बल 32 कोटींमध्ये आपला नवीन आशियाना खरेदी केला आहे.
रणबीरच्या आईवडिलांच्या घराजवळ आहे नवीन फ्लॅट
पिंकविलाच्या अहवालानुसार, आलियाचा फ्लॅट रणबीरच्या आईवडिलांच्या कृष्णा राज या बंगल्याजवळ आहे. आलियाने आपल्या नवीन घराच्या इंटेरिअर डिझायनिंगचे काम शाहरुख खानची पत्नी गौरी खानकडे सोपवले आहे. गौरीने 2016 मध्ये रणबीरच्या घराचेदेखील इंटेरिअर डिझाइन केले होते.
अलीकडेच दिवाळीनिमित्त भट्ट कुटुंबीयांनी आलियाच्या फ्लॅटमध्ये होमहवन केले होते. या पूजेत करण जोहर, अयान मुखर्जी आणि रणबीर कपूर यांच्यासह काही जवळचे मित्र सहभागी झाले होते.
आलिया आधीपासूनच दोन घरांची मालकीण आहे
आलिया भट्ट आधीपासूनच दोन घरांची मालकीण आहे. लंडनच्या कोवेंट गार्डनमध्ये तिचे एक घर आहे. त्याचबरोबर दुसरे घर मुंबईच्या जुहूमध्ये आहे. या घरात ती तिची बहीण शाहिनसोबत राहते.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात एका मुलाखतीत आलिया आपल्या पहिल्या घराविषयी बोलताना म्हणाली होती की, "मुंबईतील माझे घर (जुहू) ही माझी पहिली प्रॉपर्टी आहे." रिपोर्ट्सनुसार, आलियाने हे घर 13.11 कोटींमध्ये खरेदी केले होते.
या मुलाखतीत तिने आपल्या लंडनच्या घराविषयीही सांगितले होते. तिच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ती सुट्टीसाठी कुटुंबासमवेत लंडनला जायची तेव्हा तिथल्या घराची ती स्वप्नं पाहत असे. आलिया म्हणाली होती, "लंडनमध्ये घर विकत घेण्याचे जे मी स्वप्न पाहिले होते, ते 2018 मध्ये पूर्ण झाले. कोवेंट गार्डनमध्ये माझे घर असून येथे मी माझ्या बहिणीसोबत कधी कधी जात असते."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.