आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलेशनशिप:रणबीर कपूरसोबत आलिया भट्टला वाटतं कम्फर्टेबल, म्हणाली- जब प्यार किया तो डरना क्या

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत रणबीर आणि आलिया

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान रणबीर कपूरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले. रणबीरवर माझे मनापासून प्रेम असून त्याच्यासोबत मी खूप आनंदी असते, असे आलिया म्हणाली आहे. सोबतच तिने सांगितले की, तिला रणबीरसोबत खूप कम्फर्टेबल वाटते आणि त्यामुळेच दोघेही इतकी वर्षे एकत्र आहेत.

आलियाने रणबीरसोबतच्या डेटिंगविषयी सांगितले
आलिया म्हणाली, "यामध्ये लपवण्यासारखे काहीही नाही. तुमच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही याबद्दल बोलू नये, कारण तुम्ही त्याबद्दल खूप प्रोटेक्टिव असता, किंवा तुम्हाला त्याबाबत खात्री नसते, त्यामुळे वैयक्तिक गोष्टी तुम्ही सार्वजनिक करु इच्छित नाहीत. मी कोणाशीही रिलेशनशिपमध्ये नाही असे खोटे बोलणे मला आवडत नाही.'

आलिया रणबीरसोबत खूप खूश आहे
आलिया म्हणाली, "मी रिलेशनशिपमध्ये आहे आणि मी रणबीरसोबत खूप आनंदी आहे. मी त्याच्यावर मनापासून प्रेम करते. माझा रिलेशनशिपवर विश्वास आहे. सध्याच्या काळात मी रोमँटिक झाले आहे. खरं सांगायचं तर 'प्यार किया तो डरना क्या'. मी त्याच्यावर मनापासून प्रेम करते आणि मला त्याच्यासोबत खूप छान वाटते. म्हणूनच आम्ही इतकी वर्षे एकत्र आहोत," असे आलियाने सांगितले.

4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत रणबीर आणि आलिया
रणबीर आणि आलिया 4 वर्षांहून अधिक काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. असे म्हटले जाते की, दोघे गेल्या वर्षी लग्न करणार होते, पण कोरोनामुळे त्यांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले. रणबीरने एका मुलाखतीत म्हटले होते की, जर कोरोना व्हायरस नसता तर कदाचित आतापर्यंत त्याचे आलियाशी लग्न झाले असते. रणबीर आणि आलिया एकमेकांच्या कुटुंबांशी चांगले बाँडिंग शेअर करतात. रणबीरची आई नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी आलियाला खूप आवडतात आणि अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टवर ती त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसते. दुसरीकडे रणबीरदेखील अनेकदा आलियाची बहीण शाहीन भट्ट आणि आई सोनी राजदान यांच्यासोबत चिल करताना दिसतो.

रणबीर-आलिया जोडी 'ब्रह्मास्त्र'मध्ये पहिल्यांदा एकत्र दिसणार
लवकरच रणबीर-आलिया ही जोडी अयान मुखर्जीच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. रणबीर-आलिया व्यतिरिक्त या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन अक्किनेनी आणि डिंपल कपाडिया मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात शाहरुख खानचीही छोटी भूमिका आहे.

बातम्या आणखी आहेत...