आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबादमध्ये 'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनसाठी पोहोचले आलिया-रणबीर:ड्रेसवर लिहिले होते 'बेबी ऑन बोर्ड', तेलुगुत गायले 'केसरिया' गाणे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. 'ब्रह्मास्त्र'ची टीम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर शिल्लक सोडत नाहीये. अलीकडेच आलिया भट्ट, रणबीर कपूर, करण जोहर, मौनी रॉय, नागार्जुन अक्किनेनी, एसएस राजामौली आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम प्री-रिलीज कार्यक्रमासाठी हैदराबादला पोहोचली होती.

या कार्यक्रमातील आता एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये रणबीर आलियाची काळजी घेताना दिसतोय. यावेळी आलिया पिंक कलरचा शरारा परिधान केला होता. या आउटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसली. दरम्यान, या कार्यक्रमात आलियाच्या याच ड्रेसने अधिक लक्ष वेधून घेतले. या सूटच्या मागील बाजुला 'बेबी ऑन बोर्ड' असे लिहिले होते. आलियाने इव्हेंटमध्ये 'बेबी ऑन बोर्ड' ही टॅगलाइनही फ्लॉन्ट केली. रणबीर आणि आलियाशिवाय या कार्यक्रमात नागार्जुन, मौनी रॉय आणि करण जोहर देखील दिसले होते.

आलियाने गाण्यातून केले इम्प्रेस
या कार्यक्रमादरम्यान आलियाने तेलुगुमध्ये केसरिया गाणे गाऊन उपस्थित सर्वांची मने जिंकली. तसेच, रणबीरकडे बोट दाखवत आलियाने गाण्याच्या काही ओळी रोमँटिक पद्धतीने गायल्या. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाट केला.

अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या चित्रपटाची कथा पौराणिक कथांवर आधारित आहे. प्रेम, रोमान्स, थ्रिलर आणि सस्पेन्स सारंच या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासह बिग बी अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय यांच्या देखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...