आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादाच्या भोव-यात 'गंगूबाई काठियावाडी':कामाठीपुरा येथील रहिवाशांची चित्रपटाविरोधात न्यायालयात धाव, म्हणाले- कामाठीपुराची बदनामी होतीये

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय आहे संपूर्ण प्रकरण?

अभिनेत्री आलिया भट्टचा आगामी चित्रपट 'गंगुबाई काठियावाडी' 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात आलिया 'गंगूबाई'च्या भूमिकेत दिसणार आहे, मात्र आता हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटावर कामाठीपुरा येथील रहिवाशी आणि स्थानिक आमदाराने आक्षेप घेतला असून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या चित्रपटातून कामाठीपुराचा उल्लेख वगळण्यासाठी आमदार अमीन पटेल यांच्यासह दोन स्थानिक रहिवाशांनी याचिका दाखल केली आहे.

कामाठीपुराची बदनामी केली जात आहे
आलिया भट्टच्या या चित्रपटावर कामाठीपुरा हे नाव वापरण्यामुळे आक्षेप घेण्यात आला आहे. कामाठीपुरा येथील रहिवासी आणि आमदार अमीन पटेल आणि कामाठीपुरा येथील स्थानिक रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जात त्यांनी निर्मात्यांना कामाठीपुराचे नाव चित्रपटातून वगळण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या अर्जावर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. रिपोर्ट्सनुसार. येथील स्थानिकांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

25 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे हा चित्रपट
संजय लीला भन्साळी 'गंगुबाई काठियावाडी'चे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात आलियाशिवाय अजय देवगण, विजय राज आणि सीमा पाहवा हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची कथा हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 4 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. याशिवाय या चित्रपटाची अनेक गाणीही आत्तापर्यंत समोर आली आहेत. त्याचबरोबर हा चित्रपट 25 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...