आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूटिंग अपडेट:आलिया आजारी असल्याने  'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाला मोठा फटका बसणार नाही, जाणून घ्या सविस्तर

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आलियाचे एका दिवसाचे चित्रीकरण बाकी

अभिनेत्री आलिया भट्ट हिला अलीकडेच कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आलियाने स्वतः ही माहिती चाहत्यांना दिली आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येण्यापूर्वी आलिया तिच्या आगामी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे रखडलेले चित्रीकरण पुन्हा सुरु होण्याच्या प्रतीक्षेत होती. कारण या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने चित्रीकरण थांबवण्यात आले होते. आता आलियाला आजारी असल्याने पुन्हा चित्रीकरण रखडले आहे. मात्र याचा फटका चित्रपटाला बसणार नाही, अशी माहिती समोर येतेय.

आलियाचे एका दिवसाचे चित्रीकरण बाकी
सूत्रांच्या माहितीनुसार, गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील आलियाच्या सर्व सीन्सचे चित्रीकरण जवळजवळ पूर्ण झाले आहे. आता तिचे केवळ एका दिवसाचे चित्रीकरण बाकी आहे. त्यामुळे चित्रपटाला मोठा फटका बसणार नाहीये. आलिया कोरोनामुक्त झाल्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे चित्रीकरण पूर्ण करतील. पण यासाठी त्यांना 160 कास्ट आणि क्रू मेंबर्सना एकत्र आणावे लागणार आहे. हे काम त्यांच्यासाठी फारसे अवघड नाही.

सोशल मीडियावरुन आलियाने दिली होती कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती
आलियाने तीन दिवसांपूर्वी तिला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे,' असे आलियाने सांगितले होते.

'मी सर्व सेफ्टी प्रोटोकॉल पाळत आहे'
आलियाने लिहिले होते, 'मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. तुम्ही देखील तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा,’ या आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे. बॉयफ्रेंड रणबीर कपूर आणि आगामी 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आलियाने 11 मार्च रोजी कोविड चाचणी करुन घेतली होती. मात्र त्यावेळी तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. तरीदेखील तिने त्याकाळात स्वतःला आयसोलेट केले होते.

'गंगूबाई काठियावाडी'च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार होती
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे आलिया भट्ट लवकरच 'गंगूबाई काठियावाडी'चे रखडलेले शूटिंग पुन्हा सुरू करणार होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. आलिया भन्साळींची सेटवर परत येण्याची वाट पहात होती. मात्र आता आलिया स्वतः कोरोनाग्रस्त झाल्याने चित्रीकरण आणखी काही दिवसांसाठी थांबवण्यात आले आहे. तिचा रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट जवळजवळ पूर्ण झाला आहे. याशिवाय 'आरआरआर' या चित्रपटाद्वारे आलिया दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार असून यात ती महत्त्वाची भूमिका वठवणार आहे.

आलिया आता निर्मातीदेखील झाली आहे. अलीकडेच स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु केले असून 'इटरनल सनशाईन' हे त्याचे नाव आहे. या बॅनरखाली ती आपला पहिला चित्रपट 'डार्लिंग्ज' घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसोबतच आलिया यात भूमिकादेखील वठवणार आहे. आई मुलीच्या नात्यावर आधारित या चित्रपटात शेफाली शाह आलियाच्या आईची भूमिका साकारणार आहे. तर 'गल्ली बॉय' फेम विजय वर्मा आलियाच्या प्रियकरच्या भूमिकेत झळकणार आहे.

बातम्या आणखी आहेत...