आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीचा बॉसी लूक:गुची ब्रँडची पहली इंडियन ग्लोबल अ‍ॅम्बेसेडर बनली आलिया भट्ट, फोटोशूटचा BTS व्हिडिओ केला शेअर

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री आलिया भट्ट अलीकडेच मेट गाला 2023 इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. आता ती आंतरराष्ट्रीय ब्रँड गुचीची पहिली पहली इंडियन ग्लोबल अ‍ॅम्बेसेडर बनली आहे. गुचीने त्यांच्या ब्रँडसाठी साइन केलेली ती पहिली भारतीय अभिनेत्री आहे. यापूर्वी गुचीने कोणत्याही भारतीय अभिनेत्रीला आपल्या ब्रँडचा चेहरा बनवलेला नाही. दरम्यान, आलियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक BTS व्हिडिओ शेअर केला आहे.

ग्रे पँटसूटमध्ये दिसला बॉसी लूक
आलिया भट्टचा हा BTS व्हिडिओ Gucci ब्रँडच्या पहिल्या फोटोशूट दरम्यानचा आहे, ज्यामध्ये ती बॉस लेडी लूकमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने राखाडी रंगाचा पँटसूट घातला आणि त्यासह तिने मॅचिंग बॅग कॅरी केली. या यशाबद्दल चाहत्यांसह सेलिब्रिटीही तिचे अभिनंदन करत आहेत.

आलिया भट्टने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आलिया भट्टने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आलियाला टाइम 100 इम्पॅक्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
आलिया भट्ट लवकरच 'हार्ट ऑफ स्टोन' या अ‍ॅक्शन-स्पाय थ्रिलरमधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 2022 हे वर्ष तिच्यासाठी खूप खास होते. आलियाने 2022 मध्ये प्रतिष्ठित टाइम 100 इम्पॅक्ट अवॉर्डही जिंकला आहे. फॅशन दिवा असण्याबरोबरच ती एक उत्तम अभिनेत्री देखील आहे आणि परदेशातही तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे.

आलिया भट्टला 2 ऑक्टोबर 2022 रोजी टाइम 100 इम्पॅक्ट अवॉर्ड मिळाला.
आलिया भट्टला 2 ऑक्टोबर 2022 रोजी टाइम 100 इम्पॅक्ट अवॉर्ड मिळाला.

आलियाचे आगामी चित्रपट
आलिया भट्ट शेवटची अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र: पार्ट वन'मध्ये दिसली होती. आता ती लवकरच करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासह रणवीर सिंगही दिसणार आहे. शिवाय जया बच्चन, शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. हा रोमँटिक कॉमेडी-ड्रामा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी रिलीज होणार आहे.