आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'डार्लिंग्स'च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये पोहोचली आलिया भट्ट:पिवळ्या रंगाच्या बेल शेप्ड ड्रेसमध्ये आलियाने लपवल बेबी बंप

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बेल शेपच्या ड्रेसमध्ये आलियाने बेबी बंप लपवला

आलिया भट्टच्या आगामी 'डार्लिंग्स' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलर लाँच इव्हेंटमधील आलियाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.फोटोंमध्ये ती पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर आलियाचा हा पहिलाच पब्लिक अपिअरन्स आहे.

बेल शेपच्या ड्रेसमध्ये आलियाने बेबी बंप लपवला
बेल शेपच्या या ड्रेसमध्ये आलिया पोज देताना दिसतेय. तसेच या ड्रेसमध्ये तिचा बेबी बंपही लपलेला आहे. तिने पोनीटेल आणि हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला. फोटो शेअर करत आलियाने लिहिले की, "हा डार्लिंग्सचा दिवस आहे."

गेल्या महिन्यात केली प्रेग्नेंसीची घोषणा
आलियाने गेल्या महिन्यात तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. सोनोग्राफी करतानाचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये तिच्यासोबत रणबीर कपूर दिसत होता. आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आमचे बाळ लवकरच येणार आहे.' 14 एप्रिल 2022 रोजी आलिया आणि रणबीरचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय यांच्या उपस्थितीत विवाहबद्ध झाले होते.

चित्रपटात आई-मुलीची कथा दाखवण्यात आली आहे
नेटफ्लिक्सच्या डार्क कॉमेडी चित्रपट 'डार्लिंग्स'मध्ये आलियाशिवाय शेफाली शाह आणि विजय शर्मादेखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात आलिया आणि विजय हे विवाहित जोडपे आहेत. जस्मीत के रीन दिग्दर्शित हा चित्रपट एका आई-मुलीच्या जोडीबद्दल आहे, ज्यामध्ये एक आई तिच्या स्वतःच्या मुलीच्या नवऱ्याला पळवून नेण्यात मदत करते. या चित्रपटात आलिया आपल्या पतीच्या अत्याचाराविरुद्ध लढताना दिसणार आहे.

हा चित्रपट 5 ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार
या चित्रपटाची निर्मिती गौरी खान, आलिया भट्ट आणि गौरव वर्मा यांनी संयुक्तपणे केली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 5 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना आलियाने लिहिले की, "डार्लिंग्स हा माझ्यासाठी खूप खास चित्रपट आहे. निर्माता म्हणून हा माझा पहिला चित्रपट असेल. चित्रपट पाहिल्यानंतर आम्हाला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. मला आशा आहे की तुम्हालाही तो आवडेल.”

आलियाचे आगामी प्रोजेक्ट्स
'डार्लिंग्स' व्यतिरिक्त आलिया अयान मुखर्जीच्या बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. आलिया अलीकडेच तिचा पहिल्या हॉलिवूड प्रोजेक्ट 'हार्ट ऑफ स्टोन'च्या शूटिंगनंतर भारतात परतली आहे. याशिवाय ती करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या चित्रपटात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...