आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचित्रपटसृष्टीत अतिशय मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे. यंदाचा हा सोहळा भारतीयांसाठी फारच खास ठरला. 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला दोन श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. एस.एस. राजामौली दिग्दर्शित आरआरआर या चित्रपटाताली नाटू नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजिनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. तर बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने बाजी मारली आहे. या यशाबद्दल अभिनेत्री आलिया भट्ट हिने आनंद व्यक्त केला आहे.
आलिया भट्टने देखील ‘आरआरआर’ या चित्रपटात छोटीशी पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आलियाने 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्कर मिळाला आहे असे सांगणारे एक पोस्टर शेअर केले आणि लिहिले, "आहा…." त्याचबरोबर तिने सेलिब्रेशन करणारे इमोजीही पोस्ट केले. तिची ही स्टोरी सध्या चर्चेत आहे.
'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' हे गाणे चंद्रबोस यांनी लिहिले आहे. तर एम.एम. किरवानी यांनी या गाण्याचे संगीत दिग्दर्शन केले आहे. 'नाटू नाटू' या गाण्यातील राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या डान्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. प्रेम रक्षित याने या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. या गाण्यातील सिग्नेचर स्टेप ही आयकॉनिक ठरली आहे.
युक्रेनमध्ये झाले गाण्याचे शूटिंग
'नाटू-नाटू' या गाण्याचे शूटिंग युक्रेनमधील वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर करण्यात आले आहे. याबद्दल दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी एका मुलाखतीदरम्यान माहिती दिली होती. तसेच आरआरआर चित्रपटाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन देखील युक्रेनमधील फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले होते.
चित्रपटसृष्टीतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या 95 व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यंदाच्या सोहळा भारतासाठी खूप खास ठरला. ऑस्कर 2023 साठी ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नामांकन मिळाले होते. हा पुरस्कार आरआरआरने आपल्या नावावर केला आहे. ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग म्हणून पुरस्कार मिळाला आहे. भारताला पहिल्यांदाच नाटू नाटूमुळे या श्रेणीत ऑस्कर मिळाला आहे. या सोहळ्यात अनेक संस्मरणीय क्षण पाहायला मिळाले. नाटू नाटूला ऑस्कर जाहीर झाल्यानंतर दीपिका पदुकोण भावूक झालेली दिसली. तिचे डोळे पाणावले होते. तर आरआरआरचे दिग्दर्शक राजामौली थिएटरमध्ये सर्वात मागे बसलेले दिसले. पाहा सोहळ्यातील खास क्षण...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.