आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी कुटुंबासह राजस्थानच्या रणथंबोरमध्ये गेले होते. त्यांची तीन दिवसांची ही ट्रिप संपली असून हे दोघेही 1 जानेवारी रोजी आपल्या कुटुंबीयांसह राजस्थानहून मुंबईला परतले आहेत. रणबीर कपूरची बहीण रिद्धिमाने शुक्रवारी सोशल मीडियावर एक फॅमिली फोटो शेअर केला आहे.
फोटोमध्ये सर्वजण एका प्रायव्हेट प्लेनसमोर पोज देताना दिसत आहे. ऑलिव्ह ग्रीन ड्रेसमध्ये आलिया तर ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये रणबीर दिसतोय. रिद्धिमाशिवाय रणबीरनेही हा फोटो शेअर केला आहे.
शुक्रवारी रणबीर आणि आलियाने पाली येथे वन दौरा केला. यावेळी, दोघांनाही यावेळी वाघाचे दर्शन झाले नाही.
हे फिल्मी स्टार जयपूरहून कारने 29 डिसेंबरला रणथंभोर येथील सेव्हन स्टार हॉटेलमध्ये दाखल झाले. या ट्रिप दरम्यान रणबीर आणि आलिया रणथंभोर येथे साखरपुडा करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या दोघांसह रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण हे दोघेही न्यू इयर सेलिब्रेशनसाठी रणथंभोरला आले होते.
रणथंभोर दौर्यादरम्यान आलिया भट्टचे कॅम्पफायरचे फोटोही व्हायरल झाले होते. आलियाने हा फोटो शेअर करुन कॅप्शन देताना लिहिले, आयुष्यात पुढे जे काही असेल त्याच्यासाठी... चिअर्स. या फोटोत नीट पाहिले तर रणबीरदेखील बाजूला दिसत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.