आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीसोबत नवीन घरात शिफ्ट होणार रणबीर-आलिया:3 वर्षांनंतर कृष्णा राज बंगला झाला री कंस्ट्रक्ट, मुलीसाठी आहे एक संपूर्ण मजला

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच एका लेकीचे आईबाबा झाले आहेत. आलियाने 6 नोव्हेंबर रोजी एका मुलीला जन्म दिला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो लवकरच आपल्या मुलीसोबत न्यू कृष्णा राज बंगल्यात शिफ्ट होणार आहे. गेल्या 3 वर्षांपासून या घराचे री कंस्ट्रक्शन सुरु होते.

एक संपूर्ण मजला रणबीरच्या मुलीसाठी बनवला
न्यू कृष्णा राज बंगला 8 मजल्याचा आहे. त्यात एक मजला नीतू कपूर यांचा आहे. दुसऱ्या मजल्यावर रणबीर आणि आलिया त्यांच्या मुलीसोबत राहणार आहेत. तिसरा संपूर्ण मजला त्यांच्या मुलीसाठी असेल. तर चौथा मजला रणबीरची बहीण रिद्धिमा आणि तिच्या मुलीसाठी आहे.

या इमारतीत रणबीर-आलियाचे ऑफिस असणार आहे
याच इमारतीचा एक मजला स्विमिंग पूलसह एंटरटेन्मेंटसाठी असेल आणि एका मजल्यावर रणबीर, आलिया आणि नीतू यांचे ऑफिस असेल, जिथे ते चित्रपटांच्या स्क्रिप्ट ऐकतील. यासोबतच या नवीन घरात ऋषी कपूर यांच्या स्मरणार्थ जागा बनवण्यात आली आहे.

आमच्या आयुष्यातील सर्वात चांगली बातमी आली आहे
मुंबईतील गोरेगाव भागातील एचएन रिलायन्स रुग्णालयात आलियाने मुलीला जन्म दिला. सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये तिने ही माहिती दिली. आलियाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, 'आमच्या आयुष्यातील सर्वात चांगली बातमी आली आहे. आमचे बाळ या जगात आले आहे आणि ती एक अद्भुत मुलगी आहे. हा आनंद व्यक्त करणे कठीण आहे. आम्ही एक धन्य पालक झालो आहोत. आलिया आणि रणबीरकडून प्रेम, प्रेम, प्रेम.

दोघांचे याचवर्षी 14 एप्रिलला झाले लग्न
रणबीर आणि आलियाचे लग्न याच वर्षी 14 एप्रिलला झाले. लग्न अतिशय खासगी ठेवण्यात आले होते आणि फक्त कुटुंबातील सदस्य आणि इतर काही लोक या सोहळ्याला उपस्थित होते. लग्नाआधी दोघांनी जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते. ब्रह्मास्त्रच्या सेटवर दोघांची जवळीक वाढली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात केले.

बातम्या आणखी आहेत...