आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलिया-रणबीरला आल्या पावली परतावे लागले:हिंदू संघटनाच्या तीव्र विरोधामुळे घेता आले नाही महाकालचे दर्शन

उज्जैन24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना मंगळवारी महाकाल मंदिरात प्रवेश मिळाला नाही. दर्शनासाठी आलेल्या दोघांनाही हिंदू संघटनांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. आलिया आणि रणबीर यांच्याविरोधात हिंदू संघटनांनी मंदिराबाहेर आंदोलन केले. ज्यामुळे या दोघांनाही मंदिरात प्रवेश मिळाला नाही. मात्र त्यांच्यासोबत आलेला चित्रपट दिग्दर्शक अयान मुखर्जीने मंदिरात पोहोचून दर्शन आणि पूजा केली. हिंदू संघटनांनी अयानलादेखील काळे झेंडे दाखवले.

रणबीर, आलिया आणि अयान मुखर्जी त्यांच्या आगामी ब्रह्मास्त्र चित्रपटासाठी महाकालचे आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनला आले होते, परंतु जेव्हा त्यांना मंदिरासमोर सुरु असलेला विरोध आणि गोंधळाची बातमी मिळाली तेव्हा ते आल्या पावी परतले. दरम्यान, वाटेत त्यांना उज्जैनचे कलेक्टर आशिष सिंह यांचा फोन आला. ते चित्रपटाचा दिग्दर्शक अयानचा मित्रही आहेत. त्यानंतर तिघेही थेट उज्जैन कलेक्टरच्या बंगल्यावर गेले. गोंधळ शांत झाल्यानंतर केवळ दिग्दर्शक अयानने मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

पोलिसांना विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर सौम्य बळाचा वापर करावा लागला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, रणबीरने एका मुलाखतीत स्वतः सांगितले होते की, त्याला बीफ आवडते. अशा परिस्थितीत गोमांस खाणाऱ्यांना मंदिरात प्रवेश कसा दिला जातो, याचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागेल.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मंगळवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास महाकाल मंदिरात येणार असल्याची माहिती हिंदू संघटनांना मिळाली होती. 4 वाजल्यापासून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते व्हीआयपी प्रवेशद्वाराजवळ जमा झाले. त्यांनी तिथे आंदोलन सुरू केले. आलिया रणबीरला प्रवेश देण्यासाठी विरोध केला. पोलिसांनाही त्याची माहिती नव्हती. प्रोडक्शन टीम आणि अधिकाऱ्यांचे वाहन वेळेवर प्रवेशद्वारावर पोहोचताच हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आणि आंदोलक यांच्यात वादावादी झाली. पोलिसांनी आंदोलकांना हुसकवून लावण्याचा प्रयत्न केला.

इंदूरला रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावर आलिया-रणबीर आणि ब्रह्मास्त्रचा दिग्दर्शक अयान.
इंदूरला रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावर आलिया-रणबीर आणि ब्रह्मास्त्रचा दिग्दर्शक अयान.

11 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला
ब्रह्मास्त्र रिलीज होण्यापूर्वी, रणबीरची एक जुनी मुलाखत क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामध्ये तो म्हणत आहे की त्याला बीफ खायला आवडते. मात्र, रणबीरने ही मुलाखत 11 वर्षांपूर्वी म्हणजेच 2011 मध्ये दिली होती. ज्यामध्ये तो म्हणाला, 'मला मटण, पाय, बीफ, रेड मीट आवडते. मला गोमांस खायला आवडते.' हा व्हिडिओ एडिट करण्यात आल्याचा दावाही केला जात आहे.

आलिया-रणबीरचा चित्रपट 9 सप्टेंबरला होणार आहे प्रदर्शित
सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट तीन भागात बनवला आहे. 'ब्रह्मास्त्र'चा पहिला भाग 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. अयान मुखर्जीने याचे दिग्दर्शन केले आहे. रणबीर आणि आलियाशिवाय या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, डिंपल कपाडिया आणि नागार्जुन अक्किनेनी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात रणबीरने 'शिवा'ची तर आलियाने 'ईशा'ची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रोफेसर अरविंद चतुर्वेदी यांची भूमिका साकारत आहेत.

बातम्या आणखी आहेत...