आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ब्रह्मास्त्र’च्या शूटिंगदरम्यान झाली पहिली भेट:4 वर्षात डेटिंग, लग्न आणि फॅमिली प्लानिंग, घनदाट जंगलात फिल्मी स्टाईलमध्ये रणबीरने केले होते प्रपोज

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ब्रह्मास्त्र 9 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हा पहिलाच चित्रपट आहे ज्यात रणबीर-आलिया एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग 2018 मध्ये सुरू झाले आणि यासोबतच या दोन्ही स्टार्सची लव्हस्टोरीही सुरू झाली. या चित्रपटाचे शूटिंग काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आले, तसेच त्यांच्या नात्यात अनेक चढ-उतार आले. 2022 च्या सुरुवातीला रणबीर-आलियाने लग्न केले आणि त्यांनी चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली. आता आलिया लवकरच आई होणार असून प्रेग्नेंसीच्या काळात ती जोमात या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे.

चला तर मग एक नजर टाकुया रणबीर-आलियाचा पहिल्या भेटीपासून ते पालक होण्यापर्यंतच्या प्रवासावर-

फेब्रुवारी 2018 मध्ये, रणबीर आणि आलिया ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या शूटिंगसाठी फ्लाइटमध्ये जात होते. दरम्यान दोघंही आजूबाजूला बसले होते. यानंतर येथूनच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली होती.

आलियाने 2013 मध्ये 'कॉफी विथ करण' या शोमध्ये खुलासा केला होता की, वयाच्या 11व्या वर्षापासून रणबीर तिचा क्रश होता. ब्लॅक चित्रपटाच्या सेटवर आलियाची रणबीरशी भेट झाली, जिथे आलिया चित्रपटाच्या ऑडिशनसाठी आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत रणबीर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता.

मे 2018 मध्ये सोनम कपूरच्या लग्नात रणबीर-आलिया पहिल्यांदाच ग्लॅमरस लूकमध्ये एकत्र दिसले होते. हे दोघे पहिल्यांदाच कपल म्हणून एकत्र दिसले होते. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आणि इथून ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवांनी जोर धरला होता.

सोनमच्या लग्नात एकत्र स्पॉट झाल्यानंतर रणबीरने एका मुलाखतीत खुलासा केला होता की तो आलियाला डेट करतोय. रणबीरने असेही म्हटले होते की त्यांचे नाते अद्याप नवीन आहे आणि तो त्यांच्या नात्याबद्दल जास्त बोलू इच्छित नाही.

सप्टेंबर 2018 मध्ये ऋषी कपूर यांची तब्येत बिघडल्याने ते उपचारासाठी न्यूयॉर्कला गेले होते. ऋषी कपूर यांच्या उपचारादरम्यान आलिया अनेकदा रणबीरसोबत न्यूयॉर्कला जात असे. 2019 च्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने नीतू कपूर यांनी एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये रणबीर, आलिया, ऋषी कपूर, नीतू आणि रिद्धिमा एकत्र दिसले होते.

रणबीर कपूर आणि आलिया 2019 फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये एकत्र दिसले होते. याच कार्यक्रमात दोघांनीही एकमेकांवर प्रेम असल्याची कबुली दिली होती. आलियाने पुरस्कार स्वीकारला तेव्हा तिने आपल्या भाषणात रणबीरला आय लव्ह यू म्हटले होते.

सप्टेंबर 2019 मध्ये दोघे सुटीसाठी एकत्र आफ्रिकेत गेले होते. दोघांनीही त्यांचे हे व्हेकेशन सिक्रेट ठेवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्या ट्रीपचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हेकेशनमध्ये रणबीरने आलियाला घनदाट जंगलात फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केले होते. आलियाला खास क्षणांचे फोटो काढायला आवडतात, त्यामुळे रणबीरने आधीच कॅमेरा लावला होता.

अनेकदा एकत्र दिसल्यानंतर रणबीर-आलियाच्या लग्नाच्या बातम्या येऊ लागल्या आणि डिसेंबर 2020 पर्यंत दोघेही लग्नाच्या बंधनात अडकतील असा अंदाजही वर्तवला जात होता. यानंतरही बराच काळ दोघांनीही लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती.

2020 पासून दोघांच्या लग्नाच्या बातम्यांना उधाण आले होते. अखेर दोघांनी याच वर्षी 14 एप्रिलला लग्नगाठ बांधली. लग्नाआधीही घरातील लोकांनी लग्नाच्या बातम्यांचे खंडन केले होते, मात्र काही काळानंतर दोघेही लग्न करणार असल्याचे स्पष्ट झाले. या जोडप्याच्या लग्नाचे सर्व विधी रणबीर कपूरच्या पाली हिल येथील वास्तू अपार्टमेंटमध्ये पार पडले.

लग्नाच्या जवळपास दोन महिन्यांनंतर 27 जून रोजी आलियाने तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. याबाबतची पोस्ट आलियाने स्वतः सोशल मीडियावर शेअर केली आहे. आलिया आणि रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट 9 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. आलिया प्रेग्नेंसीच्या काळात या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये रणबीरही आलियासोबत दिसतोय.

बातम्या आणखी आहेत...