आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जेंटिनाच्या जर्सीमध्ये रणबीर-आलियाचे ट्विनिंग:आईवडील झाल्यानंतर पहिल्यांदाच एन्जॉय केली FIFA वर्ल्ड कप पार्टी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे लोकप्रिय कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नुकतेच दिग्दर्शक लव रंजन यांच्या घराबाहेर स्पॉट झाले. लव रंजन यांनी फिफा वर्ल्ड कप पाहण्यासाठी त्यांच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. यादरम्यान त्यांनी त्यांच्या जवळच्या मित्रांना आमंत्रित केले होते. या पार्टीला रणबीर आणि आलिया यांनीही उपस्थिती लावली.

अर्जेंटिनाच्या फुटबॉल जर्सी दिसले कपल
आई-वडील झाल्यानंतर रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच एका पार्टीत सहभागी झाले होते. यावेळी दोघांनी अर्जेंटिनाची फुटबॉल जर्सी घातली होती. अर्जेंटिनाच्या विजयाचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. रणबीरला फुटबॉल खूप आवडतो. त्याला अनेकदा फुटबॉल खेळतानाही बघितले जाते.

अर्जेंटिनाने तब्बल 38 वर्षांनी विश्वचषक जिंकला
फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात झाला. जगाच्या नजरा या सामन्याकडे लागल्या होत्या. तब्बल 38 वर्षांनंतर अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक जिंकला आहे. हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी शाहरुख खान, दीपिका पदुकोण, नोरा फतेही, करिश्मा कपूर, रवीना टंडन आणि कार्तिक आर्यनसह अनेक स्टार्स कतारला पोहोचले होते. आणि जे जिथे जाऊ शकले नाहीत त्यांनी कुटुंब आणि मित्रांसह मॅचची मजा अनुभवली.

आलियाने 6 नोव्हेंबरला दिला मुलीला जन्म
आई झाल्यानंतर आलिया क्वचितच सार्वजनिक ठिकाणी दिसतेय. 6 नोव्हेंबरला आलियाने मुलीला जन्म दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून आलियाने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते, "आमच्या आयुष्यातील सर्वात चांगली बातमी आली आहे. आमचे बाळ या जगात आले आहे आणि ती एक अद्भुत मुलगी आहे. हा आनंद व्यक्त करणे कठीण आहे."

रणबीर-आलियाचे आगामी प्रोजेक्ट्स

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफसोबत दिसणार आहे. दुसरीकडे, रणबीर कपूर लवकरच श्रद्धा कपूरसोबत 'तू झुठी मैं मक्कर' या चित्रपटात दिसणार आहे.

  • ​​​​​​दीपिकाने केले FIFA विश्वचषकाचे अनावरण:चषकाचे अनावरण करणारी पहिली भारतीय, रणवीर सिंगचीही उपस्थिती

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने रविवारी रात्री फिफा विश्व चषकाचे अनावरण केले. असा बहुमान मिळणारी दीपिका पहिली भारतीय ठरली आहे. आता त्याचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. यात दीपिका खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यात दीपिका पांढरा शर्ट आणि गोल्डन ओव्हर कोटमध्ये दिसली. स्पॅनिश फुटबॉलपटूसोबत दीपिकाची एन्ट्री, वाचा...

बातम्या आणखी आहेत...