आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारणबीर कपूर आणि आलिया भट्ट 14 किंवा 17 एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. अद्याप त्यांच्या लग्नाच्या तारखेबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण याच आठवड्यात दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. रणबीर आणि आलियाचा जवळचा मित्र आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीने दोघांच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब करत खास अंदाजात त्यांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अयानने या दोघांसोबत 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट बनवला आहे. यावर्षी 9 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी आलिया-रणबीरच्या लग्नाच्या निमित्ताने अयानने या चित्रपटातील केसरिया या गाण्याची खास झलक समोर आणली आहे. यासह त्याने दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
'ब्रह्मास्त्र' मधील 'केसरिया' या गाण्यात आलिया आणि रणबीर यांचा रोमँटिक अंदाज लक्ष वेधून घेतोय. दोघांचे ट्युनिंग अप्रतिम आहे.
अयान मुखर्जीने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "रणबीर आणि आलियासाठी! ... ते लवकरच या पवित्र प्रवासाला सुरुवात करणार आहेत! रणबीर आणि आलिया… या जगातली माझी सर्वात जवळची आणि प्रिय माणसं… माझी आनंदी जागा आणि माझी सुरक्षित जागा… ज्यांनी माझ्या आयुष्यात सर्वकाही जोडले आहे…आम्हाला फक्त त्यांच्या मिलनचा एक तुकडा शेअर करायचा होता, आमच्या चित्रपटातून, आमच्या केसरिया गाण्यातील... त्यांना आणि प्रत्येकाला भेट म्हणून!! उर्जा आणि सर्व आशीर्वाद, सर्व आनंद आणि सर्व पवित्रता त्यांच्याभोवती असू द्या, कारण ते जीवनाच्या एका अद्भुत नवीन अध्यायात कायमचा प्रवेश करत आहेत." असे अयान मुखर्जी म्हणाला आहे.
विशेष म्हणजे याच चित्रपटाच्या सेटवर 2018 मध्ये रणबीर आणि आलिया एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आणि आता हे दोघे त्यांच्या प्रेमाचे रुपांतर साताजन्माच्या गाठीत करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.