आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर आलियाच्या लग्नाची तयारी:वाढदिवसाच्या निमित्ताने जोधपूरला पोहोचले आलिया भट्ट आणि रणबीर कपूर, सोबत दोन्ही कुटुंब झाले स्पॉट; हेच ठरणार वेडिंग डेस्टिनेशन?

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नांच्या चर्चा पुन्हा रंगल्या आहेत. यावेळी रणबीर आपल्या वाढदिवसाच्या (28 सप्टेंबर) निमित्ताने एका दिवसापूर्वीच आलिया भट्टला सोबत घेऊन जोधपूरला पोहोचला. विशेष म्हणजे, या कपूर आणि भट्ट कुटुंबीय सुद्धा रविवारीच जोधपूर विमानतळावर स्पॉट झाले. यानंतर काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

रणबीर आणि आलिया लवकरच विवाह करणार असे वृत्त आहे. एवढेच नव्हे, तर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने ते आपल्या लग्नाचे डेस्टिनेशन ठरवण्यासाठीच जोधपूरला आले असे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोंमध्ये आलिया ग्रीन डेनिम जॅकेट आणि जीन्समध्ये दिसून येते. तर रणबीरने बरगंडी रंगाचा कॅजुअल आउटफूट घातला होता. परंतु, लग्नाबाबतच्या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

गेल्या वर्षी झाली साखरपुड्याची चर्चा
विशेष म्हणजे, रणबीर आणि आलिया यांच्या कुटुंबियांनी गतवर्षी न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी रणथंभोर गाठले होते. त्यावेळी याच ठिकाणी दोघांनी साखरपुडा केल्याची चर्चा होती. पण, ते वृत्त निव्वळ अफवा निघाल्या. त्यांनी न्यू इयर सेलिब्रेट केला तरी साखरपुडा मात्र केलेला नव्हता. रणबीरने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते, की "कोरोना व्हायरस आला नसता तर लग्नाचा प्लॅन कधीचाच झाला असता." सध्या मी या विषयावर बोलून त्यावर दुष्ट लावणार नाही. मी माझ्या आयुष्याचे ते उद्दिष्ट लवकरच साध्य करू इच्छितो. असेही तो पुढे म्हणाला होता.

ब्रह्मास्त्रमध्ये एकत्रित दिसणार आलिया-रणबीर
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. प्रोफेशनल लाइफबद्दल बोलायचे झाल्यास हे दोघे 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्रित येणार आहेत. अयान मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय सुद्धा प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.

बातम्या आणखी आहेत...