आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआलिया भट्टने 6 नोव्हेंबर रोजी एका मुलीला जन्म दिला आहे. आई झाल्याच्या महिन्याभरानंतर आता आलिया स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देतेय. आलिया नुकतीच योगा क्लासच्या बाहेर दिसली, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आलिया ब्लॅक आउटफिटमध्ये अतिशय सिंपल लूकमध्ये दिसली. स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देत असल्याने सोशल मीडिया युजर्स आलियाचे कौतुक करत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले - 'गॉर्जिअस', तर आणखी एकाने लिहिले - 'एवढ्या दिवसांनी आलिया पाहून बरे वाटले'.
आलिया-रणबीरच्या मुलीचे नाव खूप खास आहे
आलिया आणि रणबीरने काही दिवसांपूर्वीच आपल्या मुलीचे नाव जाहीर केले होते. आलियाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत मुलीची पहिली झलक दाखवली होती. या दाम्पत्याने राहा कपूर असे आपल्या लेकीचे नाव ठेवले आहे. यासोबतच हे नाव बाळाच्या आजीने म्हणजेच नीतू कपूर यांनी ठेवले असल्याचे आलियाने सांगितले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.