आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'गंगुबाई काठियावाडी'चा टीझर आला:भन्साळींच्या चित्रपटात जबरदस्त अंदाजात दिसली आलिया भट्ट, टीझरमधील संवाद वेधून घेतात लक्ष

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट यावर्षी 30 जुलैला प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाचा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भन्साळींनी त्यांच्या वाढदिवशी चित्रपटाचा टीझर रिलीज करुन वाढदिवसाची भेटच प्रेक्षकांना दिली आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. दीड मिनिटांच्या टीझरमध्ये आलियाचा जबरदस्त अंदाज लक्ष वेधून घेतो. या चित्रपटात ती अतिशय वेगळ्या अंदाजात दिसत आहे. सोबतच टीझरमधील संवाददेखील लक्षात राहणारे आहेत. टीझरमध्ये मुंबईतील रेट लाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामाठीपुरात दबदबा असणाऱ्या ‘गंगूबाई’ची कथा दाखवण्यात आली आहे.

टीझरपूर्वी आलियाने चित्रपटाचा फर्स्ट लूक आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करुन चित्रपटाची प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर केली होती. हा चित्रपट यावर्षी 30 जुलैला प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आलिया भट्ट अगदी हटके लूकमध्ये दिसली. संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्विन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. तर चित्रपटात आलिया भट्ट गंगूबाईची मुख्य भूमिका साकारत आहे. त्याचसोबत अजय देवगण आणि विक्रांत मेसी यांची महत्वाची भूमिका चित्रपटात आहे.

बातम्या आणखी आहेत...