आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊनचा परिणाम:आलिया भट्ट स्टारर गंगूबाई काठियावाडीच्या निर्मात्यांना दररोज होतोय तीन लाखांचा तोटा, केवळ 3 दिवसांचे शूटिंग बाकी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटाचे केवळ तीन दिवसांचे शूटिंग बाकी आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण थांबले आहे. याचा परिणाम म्हणजे अनेक निर्मात्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतोय. आलिया भट्ट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाच्या निर्मात्यांना दररोज सुमारे 3 लाख रुपयांचा तोटा होत आहे. रिपोर्ट्सुनसार, चित्रपटाच्या प्रॉडक्शन टीमशी संबंधित सूत्रांनी हा दावा केला आहे. चित्रपटाचे केवळ तीन दिवसांचे शूटिंग बाकी आहे. आलिया भट्टवर चित्रित झालेल्या एका गाण्याच्या बॅकग्राऊंडचा हा भाग आहे. ज्याकाळात चित्रीकरण थांबले तोपर्यंत संजय लीला भन्साळी हे पूर्ण करण्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले होते. मात्र नंतर लॉकडाऊनची घोषणा झाली.

निर्माते हा तोटा सहन करण्यास तयार
रिपोर्ट्समध्ये पुढे म्हटले आहे की, जोपर्यंत चित्रपटाचे उर्वरित शूटिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत निर्मात्यांना फिल्मसिटी येथे तयार करण्यात आलेला सेट तसाच ठेवायचा आहे. हा सेट तोडण्यापासून वाचवण्यासाठी चित्रपटाचे सह-निर्माते संजय लीला भन्साळी आणि जयंतीलाल गाडा यांना दररोज सुमारे तीन लाख रुपये खर्च करावे लागतात. सेट पुन्हा तयार करण्याच्या तुलनेत हा खर्च कमी आहे. म्हणून, निर्माते हा तोटा सहन करण्यास तयार आहेत.

चित्रीकरण लवकरच सुरु होण्याची शक्यता कमी
रिपोर्ट्समध्ये पुढे असेही लिहिले आहे की, 'गंगूबाई काठियावाडी'चे शूटिंग लवकरच सुरू होण्याची शक्यता कमी आहे. संजय लीला भन्साळी यांनी लॉकडाऊन संपल्यानंतर तातडीने शूटिंग सुरू करण्याची जोखीम पत्कारणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही, तोपर्यंत त्यांना उर्वरित तीन दिवसांचे शूटिंग सुरु करायचे नाही.

हा चित्रपट हुसेन झैदी यांच्या पुस्तकावर आधारित आहे
हुसेन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर या चित्रपटाचे कथानक बेतले असून यात डॉन गंगूबाईची कथा चित्रीत करण्यात आली आहे. गंगुबाई हे 60 च्या दशकात मुंबई माफियातील मोठे नाव होते. तिला तिच्या पतीने केवळ पाचशे रुपयांत विकल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून ती वेश्या व्यवसायात गुंतली होती. यावेळी गंगुबाईने असहाय्य मुलींच्या हितासाठी बरीच कामेही केली होती.

या चित्रपटात अजय देवगनचीही महत्त्वपूर्ण भूमिका
या चित्रपटासाठी अजय देवगण आणि संजय लीला भन्साळी तब्बल 22 वर्षानंतर पुन्हा एकत्र आले आहेत. अजय या चित्रपटात डॉन करीम लालाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले जाते. चित्रपटातील अजय देवगणचे पात्र करीम लालाचा गेटअप आणि संवाद अगदी साधे ठेवण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...