आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट अलीकडेच एका मुलाखतीत आयुष्यात घेतलेल्या निर्णयांवर मनमोकळपणाने व्यक्त झाली. मनाचे ऐकून आयुष्य आणि प्रोफेशनल लाइफचे निर्णय घेत असल्याचे तिने सांगितले. तसेच लग्नानंतर लगेचच आई होण्याचा निर्णय घेतल्याचा कधीही पश्चाताप होणार नाही, असेही आलिया म्हणाली. लग्नानंतर लगेचच आई झाल्याने तिला प्रचंड ट्रोल केले गेले. या सर्व ट्रोलिंगवर आलियाने सडेतोड उत्तर दिले आहे.
आपण जीवनाचे नियोजन करू शकत नाही
आलिया म्हणाली, "आयुष्यात काही बरोबर किंवा चूक नसते. माझ्यासाठी जे योग्य आहे, ते दुसर्यासाठी योग्य असेलच असे नाही. मी नेहमीच माझ्या मनाचे ऐकते. आपण जीवनाचे नियोजन करू शकत नाही. जीवन स्वतःच योजना बनवते आणि तुम्हाला फक्त त्या मार्गावर जावे लागेल. चित्रपट असो किंवा इतर काहीही, मी नेहमीच माझ्या मनाला ठरवू दिले आहे."
आई होण्याचा निर्णय सर्वात चांगला निर्णय
आलिया भट्ट पुढे म्हणाली, "करिअर चांगले सुरू असताना मी आई होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्णपणे माझा होता. लग्नानंतर किंवा आई झाल्यानंतर देखील माझी कोणतीही गोष्ट बदललेली नाही. कामाला सुरुवात केल्यानंतरही काहीही बदलणार नाही. आई होण्याच्या निर्णयाचा मला कधीही पश्चाताप होणार नाही. माझा निर्णय हा योग्यच आहे."
तुमचे काम चांगले असेल तर तुम्हाला काम नक्कीच मिळेल
आलिया म्हणाली, "एक आई म्हणून प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. सध्या मला लेकीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. सोबतच एक कलाकार म्हणून माझा स्वतःवर विश्वास आहे. जर तुमची मेहनत करण्याची तयारी असले, कलाकार म्हणून वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्हाला नक्कीच काम मिळेल. जर तुम्हाला काम मिळाले नाही तर ती संधी तुमची नाही हे तुम्हाला माहीत असायला हवे."
आलिया पुढे म्हणाली, "मी कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करत नाही. सध्या मी मातृत्वाचा आनंद घेत आहे. माझ्या आयुष्यात काम, करिअर हे पहिल्या क्रमांकावरच आहे. पण तुम्हाला वैयक्तिक आयुष्य आणि करिअर या दोन्ही गोष्टींची सांगड घालायला हवी. त्याक्षणी ते करा".
2022 होते आलियासाठी खूप खास
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 14 एप्रिल 2022 रोजी लग्न थाटले. डिसेंबर 2022 मध्ये आलियाने मुलीला जन्म दिला. तिने आपल्या लाडक्या लेकीचे नाव 'राहा' असे ठेवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.