आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्माती आलिया भट्टच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा:शाहरुख खानच्या 'रेड चिलीज एंटरटेन्मेंट'सोबत मिळून आलिया करणार 'डार्लिंग्स'ची निर्मिती, मुख्य भूमिकेतही झळकणार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आलियाने तिच्या निर्मिती संस्थेच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्टने नुकतीच तिच्या स्वत:च्या प्रॉडक्शन हाउसची घोषणा केली. 'इटरनल सनशाईन प्रॉडक्शन्स' हे आलियाच्या निर्मिती संस्थेचे नाव आहे. या निर्मिती संस्थेची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच आलियाने आणखी एक बातमी चाहत्यांना दिली. आलियाने तिच्या निर्मिती संस्थेच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे अभिनेता शाहरुख खानचे 'रेड चिलीज एंटरटेन्मेंट' आणि आलियाचे 'इटरनल सनशाईन प्रॉडक्शन' एकत्र येऊन चित्रपटाची निर्मिती करत असून ‘डार्लिंग्स’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

आलियाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ‘डार्लिंग्स’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा टीझर देखील तिने शेअर केला आहे. चित्रपटात आलिया निर्मातीसोबतच मुख्य भूमिकादेखील साकारणार आहे. आलियासह शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मैथ्यू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असतील. हा चित्रपट जसमीत के रीन दिग्दर्शित करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांचेही या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण होतंय.

चित्रपटाची टॅगलाइन लक्ष वेधून घेणारी आहे. "महिलांचा अपमान करणं आरोग्यासाठी खुपच धोकादायक ठरू शकतं,", अशी चित्रपटाची टॅगलाइन आहे. महिला सक्षमीकरणावर आधारित हा चित्रपट आहे. एका मध्यम वर्गीय कुटुंबातील आई मुलीचं नात आणि त्यांची समाजात ओळख निर्माण करण्यासाठी होणारी धडपड असे काहीचे चित्रपटाचे कथानक आहे.

शाहरुखनेही चित्रपटाचा टीझर शेअर करताना चित्रपटात डार्क कॉमेडी पाहायला मिळले असे त्याच्या कॅप्शनमधून सांगितले आहे. 'आयुष्य खुप कठीण आहे डार्लिंग आणि तुम्ही दोघीदेखील .. या जगाशी तुमचा सामना आहे. काळजी घ्यावी असा सल्ला', असेही शाहरुखने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...