आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा67 वर्षीय अभिनेते ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल रोजी कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या तिस-या वर्षापासून प्रत्येक प्रकारच्या भूमिका साकारल्यामुळे या चॉकलेट हीरोने तीन पिढ्यांना वेड लावले. त्यांचा मुलगा रणबीरची गर्लफ्रेंड आलिया भटही गेल्या दोन वर्षांपासून कपूर कुटुंबासाठी त्याच्या कुटूंबातील सदस्यांप्रमाणेच आहे. आता जेव्हा या कुटुंबातील प्रमुखाचे निधन झाले तेव्हा आलिया स्वत:च्या भावना रोखू शकली नाही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. आलियाने सांगितले की, गेल्या दोन वर्षांत ऋषी तिच्यासाठी मित्र आणि वडील बनले होते.
आलियाची पोस्ट...
"माझ्या आयुष्यात खूप प्रेम आणि चांगुलपणा आणणार्या या सुंदर माणसाबद्दल मी काय बोलू शकते? आज प्रत्येकजण ऋषी कपूर नावाच्या महान व्यक्तीबद्दल बोलत आहे. मी आयुष्यभर त्यांना याच रुपात ओळखते. गेल्या दोन वर्षात, ते मला माझे मित्र, चायनीज फूज लव्हर, चित्रपटांचे दिवाने, एक नेता, एक सुंदर कथाकार आणि एक वडील म्हणून गवसले आणि गेल्या दोन वर्षात मला त्यांच्याकडून जे प्रेम मिळाले ते प्रेमाने भरलेल्या मिठीसारखे आहे, जे मी कायम माझ्या मनात ठेवेल. मी देवाचे आभार मानते की त्याने मला त्यांना जाणून घेण्याची संधी दिली.
आज अर्थातच आपल्यापैकी अनेजण त्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे मानतो. कारण त्यांनी त्यांच्या कामातून तसा अनुभव दिला आहे. लव्ह यू ऋषी अंकल. तुमची नेहमीच आठवण येईल... तुम्ही जसे होता, तसेच राहिल्याबद्दल धन्यवाद."
आलियाने इंस्टाग्रामवर या पोस्टसह एक फोटो शेअर केला आहे, जो रणबीरच्या बालपणाचा आहे. फोटोमध्ये तो वडील ऋषींसोबत दिसतोय. आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले, "ब्यूटिफुल बॉइज."
आलिया नीतू यांचे सांत्वन करताना दिसली होती
गेल्या दोन वर्षांपासून आलिया रणबीरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. बुधवारी रात्री ऋषी यांना मुंबईतील एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, तेव्हा आलिया तिथे त्यांना भेटायला आली होती. गुरुवारीही ती दिवसभर कपूर कुटुंबासोबत होती आणि रणबीरची आई नीतू यांचे सांत्वन करत होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.