आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन रिलीज डेट:पुन्हा पोस्टपोन झाली आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी'ची रिलीज डेट, आता आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'सोबत होणार बॉक्स ऑफिसवर टक्कर

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री आलिया भट्टने चित्रपट पोस्टपोन झाल्याची माहिती देत प्रदर्शनाची नवीन तारीख शेअर केली आहे.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षित 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आलिया भट्ट स्टारर हा चित्रपट यापूर्वी 6 जानेवारी 2022 रोजी रिलीज होणार होता, मात्र आता हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपट पुढे जाण्याचे कारण एसएस राजामौली यांचा 'आरआरआर' हा चित्रपट असू शकतो जो 7 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्री आलिया भट्टने अलीकडेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपट पोस्टपोन झाल्याची माहिती देत प्रदर्शनाची नवीन तारीख शेअर केली आहे. आलियाने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये लिहिले आहे की, 'आम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला प्रदर्शनाची नवीन तारीख मिळाली आहे. संजय लीला भन्साळी आणि जयंतीलाल गडा यांची निर्मिती असलेला हा पेन स्टुडिओचा चित्रपट आहे. आता हा चित्रपट 18 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.'

राजामौली यांनी मानले भन्साळींचे आभार
'गंगूबाई काठियावाडी' यापूर्वी 6 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार होता, जो 2022 मधील पहिली सर्वात मोठी ओपनिंग ठरु शकला असता. मात्र दुसऱ्या दिवशीच म्हणजे 7 जानेवारी रोजी दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा 'आरआरआर' हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली गेली नसती तर दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली असती. आता 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्यानंतर 'RRR' चे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी संजय लीला भन्साळी यांचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले, 'आम्ही जयंतीलाल गडा आणि संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे कौतुक करतो. गंगुबाई काठियावाडीला आमच्या शुभेच्छा आहेत.'

'लाल सिंग चड्ढा'सोबत होणार 'गंगूबाई काठियावाडी'चा सामना
आमिर खान आणि करीना कपूर स्टारर 'लाल सिंग चड्ढा' 14 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनात केवळ 4 दिवसांचे अंतर आहे, त्यामुळे चित्रपटांच्या कमाईवर थेट परिणाम होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...