आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Alia Bhatt's Raazi Writer Harinder Sikka Makes SHOCKING Allegations On Meghna Gulzar; Says She Got His Credit Removed Because He’s An ‘Outsider’

इनसाइडर-आउटसाइडर वाद:'राझी' चित्रपटाचे लेखक हरिंदर सिक्का यांचा मेघना गुलजारवर मोठा आरोप; म्हणाले - त्यांनी मला क्रेडिट दिले नाही कारण मी बाहेरचा आहे

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लेखक हरिंदर सिक्का म्हणाले - मी बाहेरचा असल्याने मला अशी वागणूक दिली गेली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत घराणेशाहीसोबतच इनसाइडर आणि आउटसाइडरचा मुद्दा चर्चेत आहे आणि या संदर्भात इंडस्ट्रीतील अनेकांनी आपले अनुभव सांगितले आहेत. अलीकडेच लेखक आणि चित्रपट निर्माते हरिंदर सिंग सिक्का यांनी 'राझी' चित्रपटाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्यावर त्यांना अनेक प्लॅटफॉर्म्सवर क्रेडिट न दिल्याचा आरोप केला आहे.

सिक्का म्हणाले की, मेघना यांनी जयपूर साहित्य महोत्सव आणि फिल्मफेअर पुरस्कारांमधून केवळ माझे नावच वगळले नाही तर माझ्या पुस्तकाच्या अनावरणाच्या वेळीही अडथळे निर्माण केले होते. ते म्हणाले की, जयपुर साहित्य महोत्सवात मेघना यांनी माझे नाव कसे वगळले याचा पुरावा माझ्याकडे आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत.

  • 'माझे नाव काढून टाकण्यास भाग पाडले'

हरिंदर म्हणाले - 'साहित्य महोत्सवाच्या प्रमुखांनी मला पाठविलेल्या ईमेलची एक प्रत माझ्याकडे आहे. त्या मेलमध्ये त्यांनी लिहिले आहे की, "माझ्या 35 वर्षांच्या कारकीर्दीत एखाद्याचे नाव काढण्यासाठी माझ्यावर एवढा दबाव टाकताना मी कुणाला पाहिले नाही. या प्रकरणात गुलजार यांनी हे काम केले.'

  • 'पुस्तक प्रकाशित करण्यात अडचणी निर्माण केल्या'

ते पुढे म्हणाले, 'मेघना यांनी काय केले ते मी तुम्हाला सांगतो, तिला सर्व श्रेय मिळावे,यासाठी माझे पुस्तक प्रकाशित करणे कठीण केले. जयपूर साहित्य महोत्सव, फिल्मफेअर पुरस्कार, द बेस्ट ओरिजिनल स्टोरी अवॉर्ड जो मला मिळणार होता, त्यातून माझे नाव वगळण्यात आले आणि हा अवॉर्ड 'अंधाधुंध' या चित्रपटाला देण्यात आला, जो एका फ्रेंच पुस्तकाची कॉपी होता, कारण तेथून माझे नाव काढून टाकण्यात आले होते.'

  • 'ही वागणूक बाह्य असल्यामुळे मिळाली'

याशिवाय हरिंदर यांनी 'छपक' चित्रपटाचा उल्लेख करताना सांगितले की, या चित्रपटातदेखील मेघना यांनी दिल्लीच्या एका वकिलाला श्रेय दिले नाही. ते म्हणाले, 'रवीना टंडनचे वडील रवी टंडन यांच्यासोबत काय घडले होते. इंडस्ट्रीत माफियांचा संपूर्ण इतिहास आहे. मी कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या विरोधात नाही. मी बाहेरील असल्याने माझ्यासोबत हे सर्व घडले.'

'नानक शाह फकीर' हा माझा चित्रपट, जो ऑस्कर पुरस्कारासाठी जाणार होता, पण त्याला परवानगी देण्यात आली नाही. कारण बॉलिवूडमधील कोणीतरी आले आणि म्हणू लागले की हा एक आउटसाइडर आहे, आम्ही आमचा चित्रपट पाठवू', असेही हरिंदर यांनी उघड केले. 

  • 'मी मेघना यांच्या वडिलांना वचन दिले होते'

यापूर्वी न्यूज 18 ला दिलेल्या जुन्या मुलाखतीत हरिंदर यांनी मेघना यांच्यावर त्यांना 'राझी' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी आमंत्रित न केल्याचा आरोप देखील केला होता. ते म्हणाले होते, 'मी गुलजार यांना वचन दिले होते की, मी माझ्या चित्रपटासाठी मेघनालाच दिग्दर्शक म्हणून घेईन. तसेच मी आलिया भट्टला मुख्य अभिनेत्री म्हणून घेण्याबद्दल बोललो होतो. पटकथेवरही माझा आक्षेप होता. मला या चित्रपटाच्या प्री-रिलीज स्क्रिनिंगसाठी बोलावण्यात आले नव्हते.'