आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेपोमीटर रेटिंग:98 टक्के नेपोटिस्टिक आहे आलिया भट्टचा 'सडक 2', सुशांतच्या मेहुण्याने तयार केले नेपोमीटरचे रेटिंग

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत सिंह राजपूतचे मेहुणे विशाल कीर्ती यांनी पुढाकार घेतला आहे.
  • रेटिंग पाच श्रेणीतून देण्यात येईल.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्चया निधनापासून बॉलिवूडमध्ये नेपोटिज्मवरुन  वादाला तोंड फुटले आहे. घराणेशाहीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप अनेक मोठ्या सेलिब्रिटींवर होतोय. दरम्यान, सुशांतचे मेहुणे विशाल कीर्ती यांनी हा लढा देण्यासाठी एक नेपोमीटर तयार केला असून, यात पाच कॅटेगरीच्या माध्यमातून एखाद्या चित्रपटातील एकुण किती लोक नेपोटिज्ममधून आहेत, हे जाणून घेता येईल. या उपक्रमात सर्वप्रथम आलिया भट्टच्या ‘सडक 2’ चित्रपटाला रेटिंग देण्यात आली असून, हा चित्रपट 98 टक्के नेपोटिस्टिक असल्याचे सांगितले जात आहे.

25 जून रोजी रिलीज झालेल्या नेपोमीटरने पहिले रेटिंग महेश भट्ट यांच्या ‘सडक 2’ या चित्रपटाला दिले आहे. यात निर्माता, लीड कास्ट, सहाय्यक कलाकार, दिग्दर्शक आणि लेखक अशा पाच श्रेणी आहेत. 'सडक 2' ला नेपोमीटरने 98 टक्के निपोटिस्टिक असल्याचे म्हटले आहे. कारण त्याच्या पाच पैकी चार कॅटेगरीतील लोक नेपोटिज्मद्वारे इंडस्ट्रीत आले आहेत.

  • अशी आहे 'सडक 2'ची रेटिंग

निर्माता - महेश भट्ट, वडील - नानाभाई भट्ट (दिग्दर्शक)

  • लीड कास्ट

- आलिया भट्ट, वडील - महेश भट्ट (दिग्दर्शक, निर्माता), आई- सोनी राजदान (अभिनेत्री)

- संजय दत्त, वडील- सुनील दत्त (अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, राजकारणी), आई - नर्गिस (अभिनेत्री)

- आदित्य रॉय कपूर, भाऊ- सिद्धार्थ रॉय कपूर (निर्माता)

- पूजा भट्ट, वडील- महेश भट्ट (दिग्दर्शक, निर्माता)

सपोर्टिंग कास्ट - गुलशन ग्रोव्हर (सेल्फ मेड)

दिग्दर्शक- महेश भट्ट, वडील- नानाभाई भट्ट (दिग्दर्शक)

लेखक- महेश भट्ट, वडील- नानाभाई भट्ट (दिग्दर्शक)

  • बॉलिवूडमधून नेपोटिज्म संपुष्टात आणण्यासाठी पुढाकार

बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या घराणेशाही संपुष्टात आणणे हा नेपोमीटर सुरू करण्याचा उद्देश आहे. याबद्दलची माहिती देताना पेजवर सांगण्यात आले आहे की, जर चित्रपटाचे रेटिंग 40 टक्क्यांपर्यंत असेल तर ते चांगले मानले जाईल, 70 टक्के पाहण्या योग्य असेल आणि 98 टक्के असल्यास नेपोटिस्टिक समजले जाईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser