आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआलिया भट्टने 6 नोव्हेंबर रोजी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आलिया-रणबीरची मुलगी जन्मल्यापासून तिला पाहण्यासाठी बी-टाउन सेलेब्सची गर्दी होत आहे. मुलीची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे जवळचे मित्र खूप उत्सुक आहेत. चाहतेदेखील तिची एक झलक बघण्यासाठी आतूर झाले आहेत. आता आलिया आणि रणबीरने लेकीच्या सुरक्षेबाबत काही कठोर निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. बाळाचा एकही फोटो समोर येऊ नये यासाठी ते कमालिची सावधगिरी बाळगत आहेत. इतकेच नाही तर बाळाला भेटायला येणा-यांना आधी स्वतःची कोरोना चाचणी करावी लागणार आहे. कोविड चाचणीशिवाय कोणत्याही जवळच्या व्यक्तीला आलियाच्या छोट्या राजकुमारीला भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही.
बाळाला भेटण्यासाठी कपलने घेतले कठोर निर्णय
बॉलिवूड लाइफच्या रिपोर्ट्सनुसार, आलिया-रणबीरने मुलीला भेटायला येणा-यांसाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे ठेवली आहेत, जी प्रत्येकाला पाळावी लागणार आहेत. बाळाला निरोगी वातावरण देण्यासाठी, दाम्पत्याने ठरवले आहे की, घरी येण्यापूर्वी प्रत्येक जवळच्या व्यक्तीला कोविड चाचणी करावी लागेल. कोरोना टेस्ट निगेटिव्ह असायला हवी अशी अटच त्यांनी घातली आहे. खरं तर, नवजात बाळांना रोग आणि संसर्गाचा धोका सर्वात जास्त असतो. तो टाळण्यासाठी म्हणून ही सर्व खबरदारी घेतली जात आहे.
बाळाला भेटायला जाताना फोन सोबत ठेवता येणार नाही
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया-रणबीर सध्या आपल्या मुलीचा चेहरा रिव्हील करू इच्छित नाहीत. त्यामुळेच बाळाचा फोटो लीक होऊ नये म्हणून त्यांनी नो फोन पॉलिसी लागू केली आहे. बाळाला भेटायला येणा-यांना बाळाला भेटताना त्यांचा फोन सोबत बाळगता येणार नाहीये.
6 नोव्हेंबरला झाला मुलीचा जन्म
आलिया भट्टच्या मुलीचा जन्म 6 नोव्हेंबरला झाला. हे जोडपे खूप दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होते. बाळाच्या जन्माची बातमी येताच चाहत्यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. मुंबईतील गोरेगाव भागातील एचएन रिलायन्स रुग्णालयात आलियाने मुलीला जन्म दिला.
याचवर्षी 14 एप्रिलला झाले दोघांचे लग्न
रणबीर आणि आलियाचे लग्न याच वर्षी 14 एप्रिलला झाले होते. लग्न अतिशय खासगी ठेवण्यात आले होते. फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र या लग्नाला उपस्थित होते. लग्नाआधी दोघांनी जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते. 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवर दोघांची जवळीक वाढली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.