आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएसएस राजामौली यांचा नुकताच रिलीज झालेला 'RRR' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर आलिया भट्ट आणि अजय देवगण या चित्रपटात झळकले आहेत. वृत्तानुसार, आलिया भट्ट मात्र स्क्रीन स्पेस कमी मिळाल्याने दिग्दर्शकावर नाराज असल्याचे म्हटले गेले. नाराज होऊन तिने सोशल मीडियावरून 'RRR'शी संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या, अशीही चर्चा रंगली. मात्र आता आलियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून या संपूर्ण वादावर स्पष्टीकरण देत चर्चांना पुर्णविराम लावला आहे.
आलियाने पोस्ट डिलीट करण्यामागील कारण केले स्पष्ट
आलियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "मी माझ्याविषयी लोकांना बोलताना ऐकलंय की 'RRR' च्या पोस्ट्स मी डिलीट केल्या कारण मी नाराज आहे. पण माझी विनंती आहे की अशा अफवा पसरवू नका. ते ही केवळ इन्स्टाग्रामवरुन मी पोस्ट डिलीट केल्या म्हणून. मी नेहमीच जुन्या पोस्ट रीअलाइन करते की जेणेकरुन लोकांना नवीन पोस्ट पाहता येतील. मला माझ्या प्रोफाईलला स्वच्छ, सुटसुटीत ठेवायला आवडते. उगाचच पोस्टची गर्दी मला आवडत नाही''
सीता ही व्यक्तिरेखा साकारल्याने खूप खूश आहे आलिया
आलियाने पुढे लिहिले, "RRR चा मी एक भाग बनले यासाठी मी कायम राजामौली यांची आभारी राहीन. चित्रपटात 'सीता' ही व्यक्तीरेखा साकारुन मला खुप आनंद झाला आहे. राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते. तारक आणि चरणसोबत काम करणे हा एक सुंदर अनुभव होता. मी चित्रपटाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची आभारी आहे, ज्यांनी मला खूप चांगला अनुभव दिला. या चित्रपटावर राजामौली सरांनी खूप वर्ष खर्ची घातले म्हणून इतकी चांगली कलाकृती पहायला मिळाली. चित्रपटाविषयी ज्या चुकीच्या गोष्टी बोलल्या जात आहेत त्यात काही तथ्य नाही हे मी इथे स्पष्ट करते," असे स्पष्टीकरण आलियाने दिले आहे.
5 भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे RRR
'RRR' हा दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा चित्रपट आहे. हिंदी आणि तेलुगू व्यतिरिक्त हा चित्रपट तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित झाला आहे. आलिया भट्ट आणि अजय देवगणसारख्या स्टार्समुळे या चित्रपटाची चर्चा हिंदीतही आहे. याआधी हा चित्रपट 7 जानेवारीला प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद असल्याने तो अखेर 25 मार्चला प्रदर्शित झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.