आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरोदरपणात काम करण्याच्या प्रश्नावर आलियाचे विधान:म्हणाली- काम केल्याने समाधान मिळते, मी वयाच्या 100 व्या वर्षीही काम करेन

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 5 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे 'डार्लिंग्स'

आलिया भट्टने अलीकडेच तिच्या आगामी 'डार्लिंग' चित्रपटाच्या साँग रिलीज प्रोग्रामला हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये आलियाने गरोदरपणात काम करण्याबाबत मौन तोडले आहे. अभिनेत्री म्हणाली की, ती निरोगी आहे आणि विश्रांती घेण्याची तिला गरज भासत नाहीये. त्याचबरोबर आलिया म्हणाली की, काम केल्याने तिला आराम मिळतो.

तुम्ही फिट असाल तर तुम्हाला विश्रांतीची गरज भासत नाही
चित्रपटाच्या साँग रिलीज इव्हेंटमध्ये आलियाला तिच्या गरोदरपणात चित्रपटाच्या प्रमोशनच्या ताणाबद्दल विचारण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणाली, "तुम्ही तंदुरुस्त, निरोगी, ठीक असाल तर तुम्हाला विश्रांतीची गरज भासत नाही. काम केल्याने मला शांती मिळते, अभिनय ही माझी आवड आहे. मी अजूनही माझ्या कामाचा तेवढाच आनंद घेतेय. मला फारसा फरक पडलेला दिसला नाही," असे आलियाने सांगितले.

वयाच्या 100 व्या वर्षापर्यंत काम करणार - आलिया
आलिया पुढे म्हणाली, "काम माझ्या हृदय, मन आणि आत्मा जिवंत ठेवते. म्हणूनच मी वयाच्या 100 व्या वर्षीही काम करेन." रणबीर कपूरसोबत लग्न झाल्यानंतर दोन महिन्यांनी आलियाने जूनमध्ये तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती.

हॉलिवूड डेब्यू प्रोजेक्टचे शूटिंग गरोदरपणात पूर्ण झाले
आलियाने गरोदरपणात तिचा पहिला हॉलिवूड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन'चे शूटिंगही पूर्ण केले आहे. एका मुलाखतीत आलियाने या अॅक्शन फिल्मचे शूटिंग आणि प्रेग्नेंसीचा समतोल कसा साधला, याविषया सांगितले होते. आलिया म्हणाली होती, "हा माझा पहिला हॉलिवूड बिग इंग्लिश पिक्चर अनुभव होता. माझ्यासाठी तो थोडा कठीण होता, कारण मी पहिल्यांदाच एका अॅक्शन चित्रपटाचे शूटिंग करत होते. तसेच, मी चित्रीकरणादरम्यान गरोदर होते, त्यामुळे माझ्यासाठी अनेक गोष्टी एकत्र आल्या. अनेक गोष्टी एकाच वेळी एकत्र हाताळणे हे एखाद्या टास्कपेक्षा कमी नव्हते. माझे सहकलाकार गॅल गॅडट आणि जेमी डोर्ननसह संपूर्ण टीमने माझ्यासाठी ते खूप सोपे आणि कम्फर्टेबल बनवले. हा अनुभव मी कधीही विसरणार नाही, कारण मला या चित्रपटात काम करायला मिळाले. चित्रपटाच्या सेटवर मला खूप चांगली वागणूक मिळाली."

5 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे 'डार्लिंग्स'
आलिया सध्या तिच्या आगामी 'डार्लिंग्स' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडत नाहीये. आलिया आणि शाहरुख खान यांनी मिळून या चित्रपटाची संयुक्तपणे निर्मिती केली आहे. हा चित्रपट 5 ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय आलिया अयान मुखर्जीच्या आगामी 'ब्रह्मास्त्र'मध्ये तिचा पती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तिच्याकडे रणवीर सिंहसोबत करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' हा चित्रपटदेखील आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...