आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्रह्मास्त्र'चे सर्व शो हाऊसफूल्ल:हंसल मेहता यांना मिळाले नाही नाईट शोचे तिकीट, म्हणाले - मॉर्निंग शोही 60-70 टक्के फूल्ल

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'ब्रह्मास्त्र'चा मॉर्निंग शो पाहिल्यानंतर हंसल मेहता यांनी ट्विटरवर आपला रिव्ह्यू शेअर केला आहे. हंसल मेहता यांनी ट्विट करत चित्रपटाचा आनंद लुटला आणि मल्टिप्लेक्सबाहेरील लांबलचक रांगा पाहून आनंद झाल्याचे म्हटले आहे. यासोबतच त्यांनी रणबीर कपूर, आलिया भट्ट, करण जोहर आणि अयान मुखर्जी यांचेही कौतुक केले आहे आणि चित्रपट हिट होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हंसल मेहता यांना मिळाले नाही नाईट शोचे तिकीट
हंसल मेहता यांनी लिहिले, "मला ब्रह्मास्त्र खरंच खूप आवडला. काल रात्री मला शोची तिकिटे मिळाली नाहीत, म्हणून मी मॉर्निंग शोमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेलो. मला सर्वात जास्त आवडले ते म्हणजे सकाळचा शो 60-70 टक्के फुल होता. त्यानंतरच्या शोसाठीही मल्टिप्लेक्समध्ये लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चित्रपटाचा दुसरा भाग खूप मजेशीर आणि चांगला असणार आहे," असे ते म्हणाले आहेत.

हंसल मेहता यांनी ब्रह्मास्त्राचे कौतुक केले.
हंसल मेहता यांनी ब्रह्मास्त्राचे कौतुक केले.

हंसल मेहतांनी केली ब्रह्मास्त्राची प्रशंसा
चित्रपटाचे कौतुक करताना हंसल मेहता यांनी लिहिले, "मला अयान मुखर्जी, करण जोहर आणि नमित मल्होत्रा ​​यांच्या पॅशनबद्दल खूप आदर आहे. तसेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनीही अप्रतिम काम केले आहे. मला आशा आहे. हा चित्रपट नक्कीच यशस्वी होईल. बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल."

वर्ल्डवाइड ओपनिंग डे कलेक्शन 75 कोटी
ब्रह्मास्त्र 9 सप्टेंबरला सिनेमागृहात रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे ओपनिंग वर्ल्डवाइड कलेक्शन सुमारे 75 कोटी रुपये होते. कोविडनंतर एखाद्या बॉलिवूड चित्रपटासाठी ही सर्वोत्तम ओपनिंग ठरली आहे. रणबीर आणि आलियाशिवाय या चित्रपटात शाहरुख खान, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...