आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दोस्ताना 2' मध्ये पुढे काय आहे:कार्तिक आर्यनवर आरोप - जान्हवी कपूरसोबत ईगो क्लॅश आणि तारखा न दिल्याने धर्मा प्रॉडक्शनचे 20 कोटींचे नुकसान, चित्रपट होणार रीशू़ट

अमित कर्ण9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धर्मा प्रॉडक्शनला 20 कोटींचे नुकसान होणार असल्याचे सांगितले जाते.

बॉलिवूड चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी ‘दोस्ताना 2’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणारा अभिनेता कार्तिक आर्यनला रिप्लेस करण्यात आले आहे. ‘दोस्ताना 2’ या चित्रपटाची घोषणा 2018 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर या चित्रपटात कार्तिक आणि अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असे सांगण्यात आले होते. पण आता कार्तिकच्या ऐवजी दुसऱ्या एका अभिनेत्याला मुख्य भूमिकेत घेतले असल्याचे समोर आले आहे.

धर्मा प्रॉडक्शनशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिकने ‘दोस्ताना 2’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले होते. पहिल्या शेड्यूलमध्ये 20 दिवसांचे चित्रीकरण झाल्यानंतर त्याने पुढील डेट्स देण्यास नकार दिला होता. सध्या कार्तिककडे अनेक प्रोजक्ट्स असल्यामुळे तो कामात व्यग्र आहे. तसेच कार्तिकला या चित्रपटाची स्क्रिप्ट देखील फारशी आवडली नसल्याने त्याने डेट्स दिल्या नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता करण जोहरने त्याला चित्रपटातून काढून टाकल्याचे समोर आले आहे. आता चित्रपट रीशूट करावा लागणार आहे. त्यामुळे धर्मा प्रॉडक्शनला 20 कोटींचे नुकसान होणार असल्याचे सांगितले जाते.

ईगो आहे खरे कारण
दुसरीकडे, ट्रेड पंडितांनी सांगितल्यानुसार, यामागचे खरे कारण कार्तिक आणि जान्हवी यांच्यातील ईगो क्लॅश हे आहे. यामुळे कार्तिकने चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. त्याने थेट चित्रपटाला नकार दिला नाही. तारखा नसणे आणि क्रिएटिव्ह डिस्प्यूटचे कारण त्याने पुढे केले आहे. कार्तिक आर्यनचे काम सांभाळणारी एजन्सी KWAN चे अधिकारीदेखील या विषयावर मौन धारण करुन आहेत. त्यांनादेखील मेसेज आणि कॉल करण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र त्यांनी काहीही अधिकृत सांगण्यास नकार दिला आहे.

धर्माकडून निवेदन प्रसिद्ध
शुक्रवारी दिवसभर रंगलेल्या चर्चादरम्यान संध्याकाळी धर्मा प्रॉडक्शनच्या वतीने दोस्तान 2 चित्रपटाच्या कास्टिंगविषयी एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. यात म्हटले गेले की, व्यावसायिक परिस्थितीमुळे आम्ही सन्मानपूर्वक शांतता राखण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पुन्हा दोस्ताना 2 चे कास्टिंग करू. ज्याचे दिग्दर्शन कोलिन डीकुन्हा असतील. कृपया अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करा.

कार्तिक-करणच्या क्लॅशमध्ये कंगनाची उडी
'दोस्ताना 2' वरुन पुन्हा एकदा बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावर सोशल मीडियावर चर्चा रंगू लागल्या आहेत. या संपूर्ण घटनाक्रमानंतर अभिनेत्री कंगना रनोट हिनेदेखील या वादात उडी घेतली आहे. कंगनाने सोशल मीडियावरुन पुन्हा एकदा करण जोहरवर निशाणा साधला आहे. 'कार्तिक आर्यन स्वतःच्या मेहनतीवर या ठिकाणी पोहोचला आहे आणि यापुढेही तो स्वतःच्या मेहनतीवरच पुढे जात राहील. फक्त 'पापा जो' आणि त्यांची नेपो गँग यांना विनंती आहे की, कृपया आता त्याला एकटं सोडा. सुशांतसिंह राजपूतसारखे आता कार्तिकच्या मागे लागून त्याला फासावर लटकण्यास असहय्य करू नका. गिधाडांनो कृपया त्याला एकटं सोडा,' असे कंगना म्हणाली आहे.

बातम्या आणखी आहेत...