आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 41 वर्षे पूर्ण केली आहेत. अल्लू अर्जुनचे मामा (आत्याचे पती) चिरंजीवी, सामंथा रुथ प्रभू, साई धर्म तेज आणि रश्मिका मंदाना यांनीही सोशल मीडियावर अर्जुनला शुभेच्छा दिल्या आहेत.
वाढदिवसाच्या एक दिवस आधी, 'पुष्पा 2: द रुल'च्या निर्मात्यांनी चित्रपटातील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूकही शेअर केला आहे.
मामा चिरंजीवींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
अभिनेते चिरंजीवी हे अल्लू अर्जुनची आत्या सरला यांचे पती आहेत. या नात्याने चिंरजीही हे अल्लू अर्जुनचे मामा होतात. अल्लू अर्जुनला शुभेच्छा देताना चिरंजीवी यांनी ट्विट केले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय बन्नी! 'पुष्पा: द रुल'चा फर्स्ट लूकही लाजवाब आहे. शुभेच्छा!"
रश्मिकाने लिहिले- माझ्या पुष्पराजला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
अल्लू अर्जुनला शुभेच्छा देताना रश्मिका मंदानाने लिहिले, "माझ्या पुष्पराजला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 'पुष्पा'मध्ये तुझा अभिनय पुन्हा पाहण्यासाठी संपूर्ण जग वाट पाहत आहे. तुला खूप प्रेम!" रश्मिकाच्या पोस्टवर उत्तर देताना अल्लू अर्जुनने लिहिले, थँक यू माझी श्रीवल्ली.
सामंथाने शेअर केले 'पुष्पा 2: द रुल'चे फर्स्ट लूक पोस्टर
सामंथा रुथ प्रभू हिनेदेखील 'पुष्पा 2: द रुल'चे पोस्टर शेअर करत अल्लू अर्जुनला शुभेच्छा दिल्या आहेत. "तुसारखे चांगले काम करण्यासाठी मला इतर कोणीही प्रेरित करत नाही. मी तुझ्या निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना करते. गॉस ब्लेस!"
यावर अल्लू अर्जुनने लिहिले, 'थँक यू सो मच माय लव्हली सॅम.'
साई धर्म तेज यानेही दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
याशिवाय साई धर्म तेजने अल्लू अर्जुनलाही शुभेच्छा दिल्या आहेत. "बन्नी अल्लू अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा! हे येणारे वर्ष तुमच्यासाठी आनंदाचे जावो या माझ्या शुभेच्छा आहेत," असे साई म्हणाला आहे.
यावर अल्लू अर्जुनने धन्यवाद भावा असे म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.
वाढदिवसापूर्वी 'पुष्पा 2: द रुल'चे पोस्टर रिलीज
'पुष्पा 2: द रुल'च्या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसत आहे. अल्लू अर्जुनने साडी आणि सोन्याचे दागिने घातले आहेत. याशिवाय त्याच्या गळ्यात हारतुरे आणि लिंबाचा हार दिसत आहे. पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनच्या हातात बंदूकही दिसत आहे. पोस्टर पाहून अर्जुनने पोलिसांपासून वाचण्यासाठी हा गेट अप केला असावा, असा अंदाज चाहते वर्तवत आहे.
अल्लू अर्जुनचा हा लूक पाहून लोकांनी यावर भरभरून कमेंट केल्या आहेत. अल्लू अर्जुनला शुभेच्छा देत त्याच्या या लूकची प्रेक्षकांनी प्रशंसा केली आहे. एकंदरच पुष्पाचा हा लूक पाहून प्रेक्षकांची उत्कंठा प्रचंड वाढली आहे. ‘पुष्पा 2’ हा चित्रपट यावर्षी 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काल अल्लू अर्जुनने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि लिहिले - 'पुष्पा 2: द रुल' सुरू झाला आहे. अर्जुनचे चाहते या पोस्टरवर सतत कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले - तुम्ही भारतीय सिनेमाला एका वेगळ्या पातळीवर नेत आहात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.