आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती विसर्जनासाठी पोहोचला अल्लू अर्जुन:मुलगी आरासोबत दिसला नाचताना, अल्लूला पाहून चाहते झाले क्रेझी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपटसृष्टीतील स्टार्स बाप्पाला मोठ्या थाटामाटात निरोप देत आहेत. अभिनेता अल्लू अर्जुनही त्याची मुलगी अल्लू अरहासोबत गीता आर्ट्समध्ये गणेश विसर्जनासाठी पोहोचला होता. बाप्पाच्या निरोपाच्या वेळी वडील मुलगी थिरकताना दिसले. यावेळी वेळी अल्लूला पाहून त्याचे चाहते खूप उत्साहित झाले आणि त्यांनी त्याच्यासोबत सेल्फी काढण्यास सुरुवात केली.

अल्लू अर्जुन यावर्षी पुष्पा या चित्रपटात दिसला होता, ज्याची क्रेझ चाहत्यांमध्ये अजूनही कायम आहे. यंदा गणेश चतुर्थीनिमित्त पुष्पा स्टाइलमधील गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. ही मूर्ती सोशल मीडियावर खूप चर्चेत राहिली.

आता पुष्पा 2मुळे चर्चेत आहे अल्लू अर्जुन
‘पुष्पा’ चित्रपटाचा दुसरा भाग 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाच्या पहिल्या भागाचे बजेट 200 कोटी रुपये होते. तर दुसऱ्या भागाचे बजेट हे 400 कोटी रुपये इतपत असणार असल्याचे बोलले जात आहे. या महागड्या चित्रपटासाठी अर्जून जवळपास 100 कोटी रुपये मानधन घेत असल्याची चर्चा सुरु आहे. अल्लू अर्जुन जर एका चित्रपटासाठी एवढे मानधन घेणार हे ऐकूनच अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. इतकेच नव्हे तर जगभरातील महागड्या अभिनेत्यांमध्ये मानधनाच्या बाबतीत अल्लू अर्जुनचाही समावेश होईल.

बातम्या आणखी आहेत...