आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुपरस्टार अल्लू अर्जुनच्या बहुप्रतिक्षित 'पुष्पा द रुल' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. चित्रपटाशी संबंधित दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. चित्रपटाच्या दुस-या भागासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दरम्यान, अलीकडेच अल्लू अर्जुनने चित्रपटाशी संबंधित एक रंजक अपडेट दिले आहे. झाले असे की, अल्लू अर्जुन त्याचा भाऊ अल्लू सिरिशच्या नवीन चित्रपटाशी संबंधित एका इव्हेंटमध्ये पोहोचला होता. या कार्यक्रमात अल्लू अर्जुनने त्याच्या चित्रपटातील नवीन तकिया कलामचा खुलासा केला. अल्लू अर्जुनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
पार्ट 2 मध्ये बिल्कुल नहीं झुकेगा पुष्का - अल्लू अर्जुन
रविवारी अल्लू अर्जुन एका कार्यक्रमात पाहुणा म्हणून पोहोचला होता. इथे लोकांना त्याच्याकडून 'पुष्पा 2'चे अपडेट्स जाणून घ्यायचे होते. यावर अल्लूने खास अंदाजात उत्तर दिले. व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन म्हणतोय, 'मला माहित आहे की तुम्ही सर्व मला पुष्पा 2 बद्दल अपडेट्स विचारत आहात. माझ्याकडे एक अपडेट आहे. पुष्पा 1 मध्ये तुम्ही माझ्या तोंडून झुकेंगा नहीं ऐकले होते. आता पुष्पा 2 मध्ये तुम्ही बिल्कुल झुकेगा नहीं हा तकिया कलाम ऐकणार आहात. मला आशा आहे की, तुम्हाला नक्की आवडेल. मी या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे आणि आशा आहे की तुम्हीही चित्रपटाबद्दल तितकेच उत्सुक असाल.'
निर्मात्यांनी दुसऱ्या भागाचे बजेट वाढवले
निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला भाग 194 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला होता. दुसऱ्या भागासाठी निर्माते 450 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करत आहेत. तसेच मैत्री मूव्ही मेकर्सने यावेळी हिंदी डबिंगचे हक्क विकत घेतले आहेत.
पुष्पा: द राइज हा बॉक्स ऑफिसवर ठरला होता ब्लॉकबस्टर
गेल्या वर्षी 17 डिसेंबरला पुष्पा हा चित्रपट रिलीज झाला होता. यामध्ये अल्लू अर्जुन 'पुष्पराज'च्या भूमिकेत आणि रश्मिका मंदाना 'श्रीवल्ली'च्या भूमिकेत झळकली होती. हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला होता. हा चित्रपट मूळ तेलुगुमध्ये शूट करण्यात आला होता आणि नंतर तो हिंदीसह इतर भाषांमध्ये डब करण्यात आला होता. पुष्पा 1 ने जगभरात 350 कोटींहून अधिक कलेक्शन केले होते. यामुळेच निर्माते भाग 2 साठी खूप उत्सुक आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.