आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्कंठावर्धक व्हिडिओ:कुठे आहे 'पुष्पा'?, ‘पुष्पा 2’मधील अल्लू अर्जुनची पहिली झलक समोर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेला 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट प्रचंड गाजला. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान पुष्पा 2 या चित्रपटाचा एक व्हिडिओ निर्मात्यांनी आज रिलीज केला आहे. यात 'पुष्पा 2'मधील अल्लू अर्जुनची पहिली झलक समोर आली आहे.

हा व्हिडिओ पाहता 'पुष्पा' कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित होतो. पुष्पा तिरुपतीमध्ये तुरुंगातून पळून गेला असून आता बेपत्ता आहे. यामुळे शहरात दंगलीसदृश परिस्थिती निर्माण होते. या छोट्याशा व्हिडिओनंतर 'पुष्पा 2'चा संपूर्ण टिझर 7 मार्च रोजी दुपारी रिलीज होणार आहे.

"द हंट फॉर पुष्पा"या अनोख्या कॉन्सेप्ट व्हिडिओसह निर्माता मायत्री मूव्हीजने चाहत्यांना पुष्पा कुठे आहे या प्रश्नाचे उत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे. हा संपूर्ण टिझर 7 एप्रिल रोजी संध्याकाळी 4.05 मिनिटांनी रिलीज करण्यात येणार आहे.